आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापवनकुमार
अँटिबॉडी रॅपिड टेस्ट किटचे निकाल चांगले येत नसल्याने सरकारने देशात आता अँटिबॉडी रॅपिड टेस्टचा वापर न करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारने ४५ लाख अँटिबॉडी रॅपिड टेस्ट किटची ऑर्डर केली होती, ती आता रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ११ एप्रिलला आयसीएमआरच्या वतीने २५ लाख काॅम्बो आरटी-पीसीआर तपासणी किट तसेच ५२.२५ लाख व्हायरल ट्रान्समिशन मीडिया आणि ३० लाख आरएनए अॅक्सट्रॅक्शन किटसोबतच ४५ लाख अँटिबॉडी रॅपिड टेस्ट किटची ऑर्डर दिली होती. तपासणी किटची संख्याही वाढवली जाऊ शकते. मोठ्या संख्येत मजुरांना त्यांच्या गावी पोहोचवल्यानंतरची स्थिती बघून एखादा निर्णय घेतला जाईल.
आयसीएमआरच्या एका शास्त्रज्ञाने सांगितले की, सध्या कोणत्याही प्रकारची तपासणी किंवा सर्व्हिलन्ससाठी या किटचा वापर केला जाणार नाही. भविष्यात एखाद्या कंपनीने अँटिबॉडी टेस्ट किट बनवले आणि त्याचे निकाल पूर्णपणे योग्य राहिल्यास निर्णय घेतला जाईल.
अँटिबॉडी रॅपिड टेस्ट किट खराब निघाल्याने देशात कोरोना सर्व्हिलन्सच्या कामावरही परिणाम होईल. या तपासणीच्या आधारे सामुदायिक कोरोना प्रसाराच्या स्थितीचा अंदाज घेण्याच्या सरकारच्या प्रयत्नांना यामुळे धक्का बसला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.