आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'रसना' कंपनीचे संस्थापक अरीज खंबाटा यांचे निधन:वयाच्या 85 वर्षी घेतला अखेरचा श्वास

11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

'रसना' कंपनीचे संस्थापक अरीज खंबाटा यांचे निधन झाले. वयाच्या 85 वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कंपनीच्या वतीने सोमवारी निवेदन जारी करून ही माहिती देण्यात आली आहे. अरीज खंबाटा यांनी भारतीय उद्योग, व्यवसाय आणि समाजात आपल्या सेवेद्वारे महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.

अरीज खंबाटा हे अरीज खंबाटा बेनेवॉलेंट ट्रस्ट आणि रसना फाउंडेशनचे अध्यक्ष होते. तसेच ते अहमदाबाद पारशी पंचायतीचे माजी अध्यक्ष होते. याशिवाय, त्यांनी पारशी-इराणी झोराष्ट्रीयन समुदायाची संघटना असलेल्या WAPIZ या संघटनेचेही अध्यक्षपदही भुषवले आहे.

रसना हे शीतपेय जगभर प्रसिद्ध आहे. शीतपेय क्षेत्रात बहुराष्ट्रीय कंपन्यांची मजबूत पकड असूनही 'रसना' हे मार्केट लीडर ब्रँड म्हणून उदयास आला आहे. अरीज पिरोजशॉ खंबाटा यांनी 1970 च्या दशकात रसना या प्रोडक्टची सुरुवात केली होती. अल्पावधीच हे शीतपेय लोकप्रिय झाले होते. आज जगभरातील 60 देशांमध्ये रसना विकले जाते. रसना ही आता जगातील सर्वात मोठ्या शीतपेय उत्पादक कंपन्यांपैकी एक आहे.

फक्त एक रुपयात कोल्ड ड्रिंग
खंबाटा यांनी जगप्रसिद्ध 'रसना' ब्रँड तयार केला. हे फळांपासून बनवलेले शीतपेय केवळ एक रुपयात परवडणाऱ्या किंमतीत विकले. रसना हे लाखो भारतीयांची तहान जीवनसत्त्वे आणि अनेक पोषक तत्वांनी भागवते.

बातम्या आणखी आहेत...