आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजगप्रसिद्ध रथयात्रेची तयारी आता अंतिम टप्प्यात आहे. भगवान जगन्नाथ व बंधू बलभद्र आणि बहीण सुभद्रा यांच्या रथाला अंतिम रूप दिले जात आहे. कोरोनामुक्त वातावरणात दोन वर्षांनंतर रथयात्रा काढली जाणार आहे. श्री जगन्नाथ मंदिर व्यवस्थापन समितीनुसार यंदा रथयात्रेच्या दिवशी २०१९ च्या तुलनेत भाविक दुप्पट संख्येने दाखल होतील. तेव्हा १० लाखांहून जास्त भाविक आले होते. १२ जुलैपर्यंत एक कोटीहून जास्त भाविक पुरीला भेट देतील. हॉटेलमध्ये अॅडव्हान्स बुकिंग झाली आहे. मंदिर भागात चार विश्रामगृहे आहेत. सर्व हॉटेलची बुकिंग तीन महिने आधी झाली. मंदिराच्या परिसरातील हॉटेल, लॉज देखील १५ जुलैपर्यंत बुक आहेत.
सुरक्षेसाठी तैनात होणाऱ्या पोलिस जवानांचा मुक्काम शाळा-महाविद्यालयांत असेल. त्यामुळेच १५ दिवस शाळा-महाविद्यालयांना सुटी असेल. मंदिर व्यवस्थापन समितीचे सदस्य व पूजा पंडाचे सचिव माधवचंद्र पूजापंडा म्हणाले, सध्या भगवंतांचे दर्शन होत नाहीत. २९ जून रोजी त्यांचे दार उघडण्यात येईल. दर्शनासाठी यंदा ५ हजार ऐवजी ७ हजार भाविकांना संधी मिळेल. १०० रुपयांचे तिकीट घेऊन भाविक भगवंताचे दर्शन करू शकतील. भगवंतांची ११९ प्रकारे सेवा केली जाते. प्रत्येक सेवेसाठी वेगवेगळे वर्ग आहेत.
रथ उभारणीसाठी १४.७५ कोटी खर्च
यंदा भाविकांच्या संख्येचा अंदाज लक्षात घेऊन मंदिरासमोरील मार्गाचे चौपदरीकरण करण्यात आले आहे. आता रथयात्रेत जास्त भाविक सहभागी होतील. रथयात्रेदरम्यान खर्चाबद्दल पूजापंडा म्हणाले, गेल्या वर्षी राज्य सरकारकडून ४० कोटी रुपये मिळाले होते. उर्वरित खर्च मंदिर व्यवस्थापनाने केली. यंदा बजेट आलेले नाही. केवळ रथ बनवण्यासाठी १४ कोटी ७५ लाख ८८ हजार रुपये खर्च होणार आहे.
आता हॉटेलमध्ये १२ जुलैपर्यंत डिस्काउंट बंद
यात्राेत्सव २९ जून ते १२ जुलैपर्यंत चालेल. पुरी हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष रामकृष्णा देशमहापात्रा म्हणाले, पुरीमध्ये लहान-मोठी ६ हजारांहून जास्त हॉटेल आहेत. शहरात २ हजारांहून जास्त लॉजही आहेत. आतापर्यंत पाच लाखांहून जास्त लोकांनी अॅडव्हान्स बुकिंग केले आहे. १२ जुलैपर्यंत हॉटेलमध्ये कोणतेही डिस्काउंट दिले जाणार नाही. मंदिराच्या परिसरातील हॉटेल बुक झाले आहेत.
बाहेरून येणाऱ्यांसाठी जास्त अडचण
श्री जगन्नाथ मंदिर व्यवस्थापन समितीचे सुरक्षा अधिकारी व अतिरिक्त पोलिस अधीक्षक व्ही.एस. चंद्रशेखर राव म्हणाले, मंदिरात सुरक्षेसाठी १०२ जवान चोवीस तास तैनात असतील. ओडिशासह देशभरातील भाविक यात्रेत सहभागी होतील. रेल्वेकडून २५० विशेष गाड्या सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. बाहेरून येणाऱ्यांसाठी भुवनेश्वरचा देखील पर्याय आहे. तेथून सकाळी पुरीला येता येते.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.