आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामध्य प्रदेशच्या रतलाममध्ये झालेल्या राष्ट्रीय बॉडी बिल्डिंग चॅम्पियनशिपवरून काँग्रेसने भाजपवर निशाणा साधला आहे. या स्पर्धेच्या नावाखाली भाजपच्या नेत्यांनी सनातन धर्म आणि संस्कृतीची थट्टा उडवल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. भगवान हनुमानाच्या मूर्तीसमोर महिला बॉडी बिल्डर्सचे अश्लील प्रदर्शन करण्यात आल्याची टीका काँग्रेसने केली आहे. याविरोधात काँग्रेस नेत्यांनी धान मंडी भागात हनुमान चालिसासचे पठण केले. या आंदोलनात भाजप सरकारचे माजी गृहमंत्री हिंमत कोठारीही सहभागी झाले. काँग्रेसने आयोजन स्थळ गंगाजलाने धुवूनही काढले. या कार्यक्रमावर हिंदू संघटनांनीही आक्षेप घेतला आहे.
रतलामच्या आमदार सभागृहात रविवारी सकाळी 9 ते रात्री 9 पर्यंत राष्ट्रीय ज्युनियर, मास्टर्स, दिव्यांग आणि महिला बॉडी बिल्डिंग स्पर्धा-2023 झाली. यात महाराष्ट्र, हरियाणा आणि कर्नाटकातील सुमारे 350 बॉडी बिल्डर्सनी सहभाग नोंदवला. कन्या पूजन आणि भगवान हनुमानांच्या पूजेसह महापौर प्रल्हाद पटेल यांनी कार्यक्रमाचा शुभारंभ केला. याचे आयोजन प्रल्हाद पटेल ऑर्गनायझिंग कमिटी आणि रतलाम बॉडी बिल्डिंग असोसिएशनने केले होते.
स्पर्धेत व्यासपीठावर भगवान हनुमानांची मूर्ती ठेवण्यात आली होती. स्पर्धेत महिला बॉडी बिल्डर्सनी मूर्तीसमोर कॉस्च्युम आणि सँडल घालून सादरीकरण केले. विविध सामाजिक आणि राजकीय संघटनांनी सोशल मीडियावरून याला विरोध दर्शवला. हिंदू जागरण मंचाने महापौरांनी सार्वजनिकरित्या माफी मागण्याची मागणी केली आहे.
काँग्रेसने म्हटले - अश्लीलता पसरवणे लज्जास्पद
काँग्रेस नेते पारस सकलेचांचे म्हणणे आहे, रतलाममध्ये झालेल्या या आयोजनामुळे राज्याची मान शरमेने खाली झुकली आहे. आयोजनात अश्लीलता होती. हे लज्जास्पद आहे. काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र कटारियांनी म्हटले, जसे कृत्य करण्यात आले, त्याने रतलामचे नागरिक व्यथित आहेत. आयोजकांवर केस व्हायला हवी, अन्यथा आम्ही आंदोलन करू.
माजी गृहमंत्री भाजप नेते म्हणाले - महिलांचा सन्मान व्हावा, असे भाजपचे दिशानिर्देश
काँग्रेसच्या आंदोलनात सहभागी झालेले भाजपचे ज्येष्ठ नेते हिंमत कोठारींचे म्हणणे आहे, आमचे मुख्यंत्री आणि धर्मशास्त्रही सांगते की महिलांचा सन्मान व्हायला हवा. कोणत्याही कार्यक्रमात अशा प्रकारची गोष्ट झाल्यास जबाबदार व्यक्तींनी ते थांबवायला हवे. मला माहिती मिळाली की तिथे चांगली गोष्ट झाली नाही, नागरिकांना वाईट वाटले. असे होऊ नये याकडे आयोजकांनी लक्ष द्यायला हवे. महिलांचा सन्मान व्हावा हे आमचा पक्ष आणि मुख्यमंत्र्यांचे दिशानिर्देश आहेत.
महापौर म्हणाले - यात काय चूक झाली
महापौर प्रल्हाद पटेल म्हणाले- एका वरिष्ठ काँग्रेस नेत्याचे म्हणणे होते की सभागृह गंगाजलाने धूवून काढणार. पवित्र तर त्यांची आत्मा करावी लागेल. त्यांचे डोळे आणि विचार गंगाजलाने धुवायला हवे. जे शिक्षक होते, मुलांना शिकवले, त्यांना एका 54 वर्षीय महिलेत अश्लीलता दिसते.
पटेल म्हणाले - कार्यक्रमात इतर सर्व नेत्यांना शरीरसौष्ठवपटूंचे स्नायू दिसत होते, मात्र काही निवडक लोकांना अश्लीलता दिसली. हनुमान जी माता-भगिनींचे देवता नाही का. हनुमानजींसमोर त्यांनी आपल्या स्नायूंचे प्रदर्शन केले तर यात काय चूक झाली. भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र सिंह लुनेरांनी म्हटले की काँग्रेसचे कामच आहे विरोध करणे.
भाजप नगरसेवक आणि कार्यकर्त्यांचे आंदोलन
रतलाम बॉडी बिल्डिंग असोसिएशनशी संबंधित भाजप नेते आणि कार्यकर्ते औद्योगिक ठाण्यात पोहोचले. सोशल मीडियावर आयोजनाविरोधात पोस्ट टाकणाऱ्यांवर एफआयआर करण्याची मागणी केली. भाजप नेत्यांचे म्हणणे आहे की, सोशल मीडियावर धार्मिक भावना भडकावणाऱ्या पोस्ट टाकण्यात आल्या आहेत.
मणिपूरचा नीरज सिंह ठरला विजेता
राष्ट्रीय ज्युनियर, मास्टर्स, दिव्यांग आणि महिलांच्या या स्पर्धेत देशभरातील 350 हून अधिक स्पर्धक सहभागी झाले होते. यात वेगवेगळ्या गटातील विजयी स्पर्धकांना पुरस्कृत करण्यात आळे. 13 व्या ज्यु. मि. इंडिया बॉडी बिल्डिंग स्पर्धेचा किताब मणिपूरच्या नीरज सिंहने आपल्या नावे केला.
ही बातमीही वाचा...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.