आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

माणुसकीला लाजवणारी घटना:इंदुरमध्ये 87 वर्षीय व्यक्तीच्या मृतदेहाला उंदरांनी कुरतडले, एक लाख रुपये दिल्यानंतरच हॉस्पीटलने कुटुंबियांकडे दिला मृतदेह

इंदुर8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मृतदेह उंदरांनी कुरतडल्याची तक्रार केल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी न्यायालयीन चौकशीचे आदेश दिले आहेत

सोमवारी इंदुरमधील कोरोना रूग्णांवर उपचार करणार्‍या आणखी एका हॉस्पिटलने माणुसकीला लाजवणारे कृत्य केले. तीन दिवसांपूर्वी अन्नपूर्णा परिसरातील युनिक हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या 87 वर्षीय वृद्ध व्यक्तीचा रविवारी रात्री उशिरा मृत्यू झाला. मृतदेह ठेवण्यात रुग्णालयाने दुर्लक्ष केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. मृतदेहाला उंदरांनी कुरतडले आहे. हॉस्पीटलनेही एक लाखांचे बिल दिले तेव्हाच मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात दिला. प्रकरण उघडकीस आल्यानंतर जिल्हाधिकारी मनीषसिंग यांनी न्यायालयीन चौकशीचे आदेश दिले आहेत.

इटवरिया बाजार येथील रहिवासी नवीन चंद जैन (87 वर्षे) यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे 17 सप्टेंबर रोजी युनिक हॉस्पिटलमध्ये दाखल केले. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार वृद्धावर कोविड वॉर्डमध्ये उपचार सुरू होते. रविवारी रात्री तीनच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली. हॉस्पीटलकडून आम्हाला सांगण्यात आले की, पालिकेची गाडी मृतदेहाला अंत्यविधीसाठी घेऊन जाईल. दुपारी 12 वाजता जेव्हा आम्ही रुग्णालयात पोहोचलो तेव्हा पाहिले की, त्यांचा मृतदेह उंदीरांनी जागोजागी कुरतडला होता. आम्ही व्यवस्थापनाशी बोललो तेव्हा ते म्हणाले की, आम्हची चुक झाली.

एक लाख रुपयांचे बिल दिले, मृतदेहावर गंभीर जखमा होत्या

कुटुंबातील प्राची जैन म्हणतात, "जेव्हा हॉस्पिटलमध्ये आलोत, तेव्हा एक लाखाहून अधिकचे बिल दिले. बिल दिल्यानंतरच मृतदेह आम्हाला दिला. मृतदेह पाहून आम्हाला धक्का बसला. चेहऱ्यावर आणि शरीरावर गंभीर जखमा होत्या. हॉस्पीटल प्रशासनाने मृतदेह अशा ठिकाणी ठेवला होता, जिथे उंदीर होते. उंदरांनी त्यांच्या शरीरावर ठिकठिकाणी कुरतडले, त्यांच्या डोळ्यावरही गंभीर जखम होती. ''

आम्हाला भेटू दिले नाही, संध्याकाळी बोलणे झाले होते

कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, भरतीनंतर हॉस्पिटलवाल्यांनी आम्हाला भेटू दिले नाही. रविवारी संध्याकाळी 4 वाजता फोनवर बोललो तेव्हा ते चांगले बोलत होते. रूग्णालयाने रात्री साडेआठ वाजता आम्हाला फोन केला आणि आम्हाला प्रकृती गंभीर असल्याचे सांगून कागदावर सही घेतली. रात्री साडेतीन वाजता त्यांनी रुग्णाचा मृत्यू झाल्याचे सांगितले. आम्हाला सांगितले असते, तर आम्ही रात्रीच मृतदेह घेऊन गेलो असतो. आमच्यावर अन्याय झाला आहे.

इंदुरमध्ये यापूर्वी समोर आले दोन प्रकरण

9 सप्टेंबरला एमवायएचमध्ये एका कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला होता, पण कुटुंबाला दहा दिवसानंतर मृत्यूची माहिती दिली. तसेच, 15 सप्टेंबरला एमवायएचमध्ये स्ट्रेचरवर पडलेल्या एका मृतदेहाला सांगाडा झाला. मृतदेहातून दुर्गंधी आल्यावरही कोणी त्याकडे लक्ष दिले नव्हते.

बातम्या आणखी आहेत...