आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदींचे माजी मंत्रीही होणार राज्यपाल:रविशंकर प्रसाद यांना तामिळनाडूचे राज्यपाल पद दिले जाऊ शकते, मंत्रिमंडळ विस्ताराच्या वेळी देण्यात आला होता नारळ

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

मोदी मंत्रिमंडळातून काढून टाकले गेलेले रविशंकर प्रसाद यांना तमिळनाडूचा राज्यपाल म्हणून नियुक्त केले जाईल अशी चर्चा आहे. रवी शंकर प्रसाद यांना तामिळनाडूचे राज्यपाल म्हणून निश्चित करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती स्थानिक माध्यमांनी दिली असून अद्याप याची औपचारिक घोषणा होणे बाकी आहे.

परंतु याविषयी आतापर्यंत संघटना किंवा सरकारकडून काहीही बोलले गेले नाही. त्याचबरोबर प्रसाद यांच्याकडूनही अशी कोणतीही माहिती मिळालेली नाही. बनवारीलाल पुरोहित सध्या तामिळनाडूचे राज्यपाल आहेत.

संघटनेत मोठे पद देण्याची चर्चा
मोदी मंत्रिमंडळातून काढून टाकलेले मोठे चेहरे रविशंकर प्रसाद आणि प्रकाश जावडेकर यांना संघटनेत मोठे पद देण्याची चर्चा जोरात सुरू आहे. अशा परिस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनी रविवारी पक्षाचे सरचिटणीस यांच्या भेटीनंतर रविशंकर प्रसाद यांची तामिळनाडूचे राज्यपाल म्हणून नियुक्ती केल्याची चर्चा आहे.

पक्षातील सूत्रांचा दावा आहे की, पुढच्या वर्षी उत्तर प्रदेशसह 5 राज्यांत होणाऱ्या विधानसभा निवडणुका पूर्वी रविशंकर प्रसाद आणि प्रकाश जावडेकर यांना संघटनेत राष्ट्रीय सरचिटणीस किंवा उपराष्ट्रपती बनवले जाऊ शकते.

केंद्रीय मंत्रिमंडळात नुकत्याच झालेल्या फेरबदलामध्ये पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस भूपेंद्र यादव यांचा समावेश करण्यात आला आहे. अशा परिस्थितीत एक अनुभवी नेत्याला त्यांच्या जागी स्थान देता येईल. यापूर्वीही पक्षाच्या संघटनेत प्रसाद आणि जावडेकर यांची मोठी भूमिका होती.

..तर गहलोत यांच्यानंतर होणार दुसरे राज्यपाल
रविशंकर प्रसाद यांना तामिळनाडूचा राज्यपाल बनवल्यास ते राज्यपालची जबाबदारी सांभाळणारे थावरचंद गेहलोतनंतर दुसरे नेते असतील. मंत्रिमंडळातून राजीनामा दिल्यानंतर लवकरच गहलोत यांना कर्नाटकचा राज्यपाल बनवण्यात आले होते. पक्षाच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार रविशंकर प्रसाद आणि जावडेकर यांना महत्त्वाची जबाबदारी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...