आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Ravi Shankar Prasad Twitter DMCA Notice; America Digital Millennium Copyright Act

यामुळे ब्लॉक झाले कायदामंत्री:​​​​​​​रविशंकर प्रसादांनी तीन वृत्तवाहिन्यांना दिलेल्या मुलाखतींच्या व्हिडिओ क्लिप शेअर केल्या होत्या, ट्विटरने याला कॉपीराइटचे उल्लंघन मानले

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • यूएस कॉपीराइट कायद्याला डिजिटल मिलेनियम कॉपीराइट अॅक्ट (DMCA) म्हणतात.

शुक्रवारी सकाळी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरने आयटी आणि कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांचे अकाउंट एक तासासाठी ब्लॉक केले. नंतर त्यांना अनब्लॉकही करण्यात आले. ट्विटरने डिजिटल मिलेनियम कॉपीराइट अ‍ॅक्ट (डीएमसीए) हे कारवाईमागील कारण असल्याचे सांगितले. हा अमेरिकेचा कॉपीराइट कायदा आहे.

खरेतर रविशंकर प्रसाद यांनी सोशल मीडियाच्या मार्गदर्शक सूचना आणि त्यांच्या पालनाच्या अनुषंगाने वृत्तवाहिन्यांना मुलाखती दिल्या होत्या. या मुलाखतीची क्लिपिंग त्यांनी 23 आणि 24 जून रोजी आपल्या ट्विटर अकाउंटवर शेअर केली आहे. ट्विटरने याला यूएस कॉपीराइट कायद्याचे उल्लंघन मानले आहे. प्रश्न आणि उत्तरात संपूर्ण प्रकरण समजून घ्या ...

ट्विटरने खाते का ब्लॉक केले?
ट्विटरने रविशंकर यांचे अकाउंट ब्लॉक करत पोस्ट केली होती. यात ट्विटरने म्हटले होते की आपले खाते ब्लॉक केले जात आहे, कारण आम्हाला तुमच्या अकाउंटमधील पोस्टबद्दल डीएमसीए अंतर्गत तक्रार मिळाली आहे. याय डीएमसीए अंतर्गत कॉपीराइट असणारा ट्विटरसमोर हा दावा करु शकतो की, कुणी यूजर त्यांच्या कंटेंटच्या कॉपीराइटचा उल्लंघन करत आहे. डीएमसीएअंतर्गत वाजवी तक्रार मिळाल्यास ट्विटर असा कंटेंट हटवू शकतो.

ट्विटर रिपीट कॉपीराइट पॉलिसी मेंटेन करते. त्याअंतर्गत वारंवार कॉपीराइट कायद्याचे उल्लंघन केल्यास वापरकर्त्याचे खातेही निलंबित केले जाऊ शकते. डीएमसीएचे वारंवार उल्लंघन केल्यास आपले खाते देखील निलंबित केले जाऊ शकते. आपले खाते पुन्हा वापरण्यासाठी आपल्याला ट्विटरच्या कॉपीराइट धोरणाचे पुनरावलोकन करणे आवश्यक आहे.

खाते अनलॉक करण्याबद्दल ट्विटरने काय म्हटले?
खाते अनलॉक केल्यावर ट्विटरने म्हटले आहे की जर पुन्हा तुमच्या अकाउंटविरोधात नोटीस आली तर तुमचे अकाउंट ब्लॉक केले जाऊ शकते. हे सस्पेंड देखील केले जाऊ शकते. असे होऊ नये यासाठी तुम्ही आमच्या कॉपीराइट धोरणाचे उल्लंघन करू नका. आपल्या अकाउंटवरुन तुम्ही अधिकृत नसलेली सामग्री त्वरित काढा.

ट्विटरने कोणत्या कंटेंटवरुन ही कारवाई केली?
रविशंकर प्रसाद यांनी ट्विटरवर 23 आणि 24 जून रोजी 3 न्यूज चॅनेलवर दिलेल्या मुलाखतीच्या क्लिपिंग्ज पोस्ट केल्या होत्या. यात त्यांनी देशात लागू केलेल्या आयटी कायद्यांविषयी भाष्य केले होते. या कायद्यांतर्गत सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर काही मार्गदर्शक तत्त्वे लागू करण्यास सांगितले गेले होते.

रविशंकर प्रसाद यांनी एका मुलाखतीत म्हटले होते की, भारतातले यूजर्स ट्विटर आणि व्हॉट्सअ‍ॅप वापरु शकतात. परंतु, जर एखादे पोस्ट किंवा संदेश देशातील जातीय सलोखा किंवा कायदा व सुव्यवस्थेचे वातावरण विस्कळीत करत असेल तर त्या प्लॅटफॉर्मने भारतात प्रथम असा संदेश कोणी पोस्ट केला हे सांगायलाच हवे.

ट्विटरने भारत सरकारच्या मार्गदर्शक सूचनांचे अनुसरण केले?
नाही. नवीन आयटी नियमांचे पालन न केल्यामुळे भारत सरकारने ट्विटरकडून देशातील मध्यस्थ प्लॅटफॉर्मचा दर्जा मागे घेतला होता. म्हणजेच आता ट्विटर आपल्या प्लॅटफॉर्मवर केलेल्या पोस्टसाठी जबाबदार असेल.

ट्विटरवरील कारवाईनंतर कायदामंत्र्यांनी काय म्हटले होते?
केंद्रीय कायदा मंत्री रविशंकर प्रसाद म्हणाले की ट्विटर कायदेशीर संरक्षणास पात्र आहे की नाही याबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या प्रकरणातील साधा मुद्दा असा आहे की 26 मेपासून अंमलात आलेल्या मार्गदर्शक सूचनांचे अनुसरण करण्यात ट्विटर अपयशी ठरला आहे. यानंतरही त्याला बऱ्याच संधी देण्यात आल्या होत्या. तरीसुद्धा, त्यांनी जाणीवपूर्वक मार्गदर्शक सूचना न पाळण्याचा मार्ग निवडला.

यूएस कॉपीराइट कायदा काय आहे, ट्विटर भारतात त्याचा वापर करू शकतो?
ट्विटर भारत सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी करण्यात अपयशी ठरले असले तरी, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील पोस्ट, संदेश आणि खात्यांच्या संदर्भात केवळ अमेरिकन कायद्यानुसार कारवाई केली जाते. रविशंकर प्रसाद प्रकरणातही त्यांनी हेच केले आहे.

यूएस कॉपीराइट कायद्याला डिजिटल मिलेनियम कॉपीराइट अॅक्ट (DMCA) म्हणतात. ऑक्टोबर 1998 मध्ये तत्कालीन अमेरिकेचे अध्यक्ष बिल क्लिंटन यांनी हा कायदा बनवला होता. त्यानंतर क्लिंटन म्हणाले की हा कायदा बनवण्याचा हेतू कोणत्याही कंटेंटला चोरीपासून संरक्षण देणे आणि चोरी झाल्यास आरोपीविरूद्ध कारवाई करण्यास मदत करणे हा आहे. या अंतर्गत ऑडिओ, व्हिडिओ, मजकूर, सामग्री अशा सर्व प्रकारच्या डिजिटल प्रोडक्ट येतात.

बातम्या आणखी आहेत...