आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Ravindra Jadeja Post For Wife Rivaba After Win | Gujarat Assembly Election | Rivaba Jadeja

रवींद्र जडेजाने पत्नी रिवाबाचे केले अभिनंदन:फोटो शेअर करत म्हणाला, हॅलो MLA, निवडणूक विजयाच्या तुम्हीच खऱ्या हक्कदार!

अहमदाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुजरात विधानसभा निवडणुकीत विजयी झालेल्या पत्नी रिवाबाला क्रिकेटपटू रविंद्र जडेजाने खास पद्धतीने शुभेच्छा दिल्या आहेत. जडेजाच्या या अनोख्या शुभेच्छांची आता सोशल मीडियात चांगलीच चर्चा होत आहे.

हॅलो आमदार म्हणत शुभेच्छा

जडेजाने पत्नी रिवाबांना 'हॅलो, आमदार महोदया' असे संबोधत त्यांना विजयाबद्दल शुभेच्छा दिल्या आहे. रविंद्र जडेजाने ट्विटरवर एक फोटो टाकून पत्नीला निवडणूक विजयासाठी शुभेच्छा देताना म्हटले आहे की,

'हॅलो आमदार महोदया, तु यासाठी पूर्णपणे पात्र आहेस. जामनगरच्या जनतेचा हा विजय झाला आहे. मी सर्व लोकांचे मनापासून आभार मानतो. जामनेरची कामे खूप चांगली होतील अशी प्रार्थना मी माँ आशापुराकडे करतो. जय माताजी🙏🏻 #मारुजामनगर'

यासोबत पत्नी रिवाबासोबतचा एक फोटोही रविंद्र जडेजाने शेअर केला आहे. या फोटोत जडेजाची पत्नी रिवाबांच्या हातात एमएलए गुजरात असे लिहिलेला एक बोर्ड दिसतो.

रविंद्र जडेजाचे ट्विट.
रविंद्र जडेजाचे ट्विट.

जडेजाच्या या अनोख्या शुभेच्छांची सोशल मीडियात चांगलीच चर्चा होत आहे. दरम्यान, पत्नीच्या निवडणूक विजयासाठी जडेजानेही पूर्णपणे झोकून दिले होते. जडेजाने अनेक प्रचारसभांमध्ये सहभाग नोंदवत पत्नीच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.

बातम्या आणखी आहेत...