• Home
  • National
  • RBI Governor 22 May press conference, Big announcements can be made about the economy latest news and updates

आरबीआयचा दिलासा / कर्ज स्वस्त करण्यासाठी रेपो दर 0.40% ने कमी केला, कर्ज भरण्याची मुदत ऑगस्टपर्यंत वाढवली

  • आरबीआय गव्हर्नर यांची मागील दोन महिन्यांत तिसरी पत्रकार परिषद

दिव्य मराठी

May 22,2020 11:12:18 AM IST

नवी दिल्ली. सामान्य माणूस आणि व्यावसायिकांच्या आर्थिक स्थितीवर लॉकडाऊनचा परिणाम पाहता आरबीआयने आज महत्त्वपूर्ण घोषणा केल्या. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे (आरबीआय) गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी रेपो दरात 0.40% कपात करण्याची घोषणा केली. यामुळे आता रेपो दर 4.40% वरून 4% वर येईल. त्याच वेळी, रिव्हर्स रेपो दर 3.75% वरुन 3.35% पर्यंत कमी केला गेला. कर्ज भरण्याची मुभा 3 महिन्यांनी वाढविण्यात आली असून त्याचा फायदा ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहे.

नाणे धोरण समितीच्या 6 पैकी 5 सदस्यांनी रेपो दर कमी करण्याच्या बाजूने मतदान केले. 3 जून रोजी समितीची बैठक होणार होती, परंतु ती आधीच घेण्यात आली.

पीएमआय 11 वर्षांच्या निचांकीवर

  • कोरोनाव्हायरसमुळे जागतिक अर्थव्यवस्थेचे नुकसान झाले आहे. एप्रिलमध्ये ग्लोबल मॅन्युफॅक्चरिंग पीएमआय 11 वर्षाच्या नीचांकावर खाली आला. डब्ल्यूटीओच्या मते, जगातील व्यवसाय यावर्षी 13 ते 32% कमी होऊ शकतो.
  • दोन महिन्यांच्या लॉकडाऊनमुळे देशातील अर्थचक्रावर वाईट परिणाम झाला आहे. उद्योगाचे सर्वाधिक अव्वल 6 राज्ये रेड आणि ऑरेंज झोनमध्ये आहेत. या राज्यांमधील इंडस्ट्रीचा आर्थिक कामात 60 टक्के वाटा आहे.
  • कोरोनाचा परिणाम पाहता, 2020-21 च्या उत्तरार्धात जीडीपी वाढ नकारात्मक होईल अशी अपेक्षा आहे. दुसऱ्या सहामाहीत काही गती मिळू शकते.
  • आरबीआय सतत परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. अर्थव्यवस्थेच्या सर्व विभागांवर आमच्या टीमची नजर आहे. कोरोनामुळे जागतिक वाढीमध्ये घसरण येईल असे आम्ही फेब्रुवारीमध्ये म्हटले होते. त्यानंतर आरबीआयने लिक्विडिटी आघाडीबाबत अनेक निर्णय घेतले आहेत.

मागील दोन महिन्यांत तिसरी पत्रकार परिषद

कोरोनाव्हायरसशी संबंधित उपाययोजना करण्यासाठी गेल्या दोन महिन्यांत आरबीआय गव्हर्नर शक्तीकांतक दास यांची ही तिसरी पत्रकार परिषद असेल. आरबीआय गव्हर्नर यांनी 27 मार्च रोजी पहिली आणि 17 एप्रिल रोजी दुसरी पत्रकार परिषद घेतली होती. या दोन्ही पत्रकार परिषदांमध्ये शक्तिकांत दास यांनी अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी आणि बँकिंग प्रणालीतील लिक्विडिटी वाढविण्यासाठी अनेक उपायांची घोषणा केली होती.

X