आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोप:रिझर्व्ह बँक रद्द करू शकते 40 एनबीएफसींचे परवाने, भारतीय नागरिकांची गोपनीय माहिती (आधार, बँक तपशील वगैरे) चिनी कंपन्यांकडे जात असल्याचा त्यांच्यावर आरोप

नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशातील ४० बँकेतर वित्तीय कंपन्यांचे (एनबीएफसी) परवाने रद्द केले जाऊ शकतात. अंमलबजावणी संचालनालयाने त्यांची एक यादी तयार करून त्यांचे परवाने रद्द करण्यासाठी रिझर्व्ह बँकेला सांगण्यात आले आहे. या एनबीएफसी चिनी फिनटेक अॅपच्या माध्यमातून लहान वैयक्तिक कर्ज देतात. त्यामुळे भारतीय नागरिकांची गोपनीय माहिती (आधार, बँक तपशील वगैरे) चिनी कंपन्यांकडे जात असल्याचा त्यांच्यावर आराेप आहे.

या एनबीएफसींचे कर्ज देणे आणि वसुली करण्यावर कोणतेही नियंत्रण नाही. त्याची संपूर्ण प्रक्रिया चीनच्या फिनटेक कंपन्यांद्वारे हाताळली जाते. अनेक अनियमितता आणि इतर तक्रारी प्राप्त झाल्यानंतर सरकारने चिनी फिनटेक आणि एनबीएफसी कंपन्यांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.

बातम्या आणखी आहेत...