आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Re target Killing In Kashmir; Faujdar Shot Dead, 9 Killed In 24 Days |marathi News

काश्मिर जल रहा है:काश्मिरात पुन्हा टार्गेट किलिंग; फौजदाराला गोळ्या घातल्या, 24 दिवसांत 9 जणांची हत्या

श्रीनगर10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

काश्मीरमध्ये अतिरेक्यांकडून केले जाणारे टार्गेट किलिंग थांबायचे नाव घेत नाही. पुलवामाच्या पंपोर भागात शुक्रवारी अतिरेक्यांनी जम्मू-काश्मीरातील पोलिस उपनिरीक्षक फारुख अहमद मीर यांची गोळी झाडून हत्या केली. छिन्नविच्छिन्न झालेला मीर यांचा मृतदेह त्यांच्या शेतात आढळला.

अमरनाथ यात्रा काही दिवसांत सुरू होणार आहे. यापार्श्वभूमीवर हल्ले करून दहशतीचे वातावरण तयार करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यात प्रामुख्याने बिगर काश्मिरी व्यक्तींवर निशाणा साधला जात आहे. गेल्या महिन्यापासून काश्मीरमध्ये अतिरेकी स्थानिक, बिगर स्थानिक नागरिक आणि सुरक्षा जवानांवर निशाणा साधत आहेत. काश्मिरात मे-जूनमध्ये आतापर्यंत ९ जणांनी अतिरेकी हल्ल्यांत प्राण गमावले आहेत. यामध्ये ४ पोलिस आहेत. २ जून रोजी कुलगाममध्ये राजस्थानच्या बँक व्यवस्थापकाची हत्या केली. ३१ मे रोजी कुलगाममध्येच शिक्षिका रजनी बाला यांची गोळी झाडून हत्या केली. या हल्ल्यानंतर काश्मिरी हिंदूंनी पलायनास सुरुवात केली आहे.

७ मेपासून दहशतवादी बेलगाम
२५ मे : बडगाममध्ये घरात टीव्ही कलाकार अमरीन भटची हत्या.
२४ मे : बारामुल्लात दारूच्या दुकानावर ग्रेनेड हल्ला, राजोरीचे सेल्समन रणजितसिंह यांचा मृत्यू.
१३ मे : पुलवामाच्या गडुरा गावात नि:शस्त्र पोलिस रियाज अहमदची हत्या.
७ मे : श्रीनगरमध्ये डॉ. अली जान रोडवर आयवा पुलाजवळ अतिरेक्यांच्या हल्ल्यात पोलिस कॉन्स्टेबल गुलाम हसन डार यांचा मृत्यू.

बातम्या आणखी आहेत...