आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासलग 10 वर्षांपर्यंत राजकीय रणनितीच्या जगात काम केल्यानंतर बहुचर्चित निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर आता राजकारणाऱ्या मैदानात उतरलेत. ते सध्या जन सुराज पदयात्रा, बात बिहार की व यूथ इम्पॉर्टंस कार्यक्रमाच्या माध्यमातून बिहारच्या राजकीय रणांगणात आपली मुळे घट्ट रोवण्याचा प्रयत्न करत आहेत. बिहारमध्ये 2024 मध्ये लोकसभा निवडणूक व 2025 मध्ये विधानसभेचा फड रंगणार आहे. त्यामुळे पीकेंनी आतापासूनच आपली आय-पॅक (I-PAC)कंपनी तिथे तैनात केली आहे.
I-PAC सूत्रांच्या माहितीनुसार, जवळपास 100 हून अधिक स्टाफ पीकेंच्या योजनेला मूर्त रुप देण्यासाठी युद्धपातळीवर काम करत आहे. पीकेंनी ज्या रणनितीने बंगालमध्ये ममता बॅनर्जींना विजय मिळवून दिला होता, तीच रणनिती ते बिहारमध्ये वापरत आहेत. बिहारमध्ये पीके एकाचवेळी 3 रणनितींवर काम करत आहेत.
चला तर मग जाणून घेऊया पीकेंची रणनिती...
जन सुराज यात्रा - 15 हजार इन्फ्लुएंसर्सची भेट घेणार
महात्मा गांधींची कर्मभूमी असलेल्या चंपारणचे प्रशांत किशोर 2 ऑक्टोबर रोजी जन सुराज पदयात्रा काढतील. या यात्रेत ते बिहारच्या मतदारांना भेटून त्यांचे मत जाणून घेतली. तसेच त्याचा भविष्यात निवडणूक जाहिरनाम्यात समावेश करतील. तत्पूर्वी, ते जिल्हा पातळीवरील जवळपास 15 हजार प्रभावशाली लोकांची भेट घेतली. यात व्यापारी, शिक्षणतज्ज्ञ, समाजसेवक व धार्मिकि संघटनेच्या लोकांचा समावेश असेल.
4 मे 2022 रोजी पाटण्याचे केबीसी विजेते सुशील कुमार यांनी पीकेंची भेट घेतली. त्यानंतर बोलताना त्यांनी पीके आताच राजकीय पक्षाची स्थापना करणार नसल्याचे सांगितले. पीकेंनी या मोहिम फत्ते करण्यासाठी पाटण्याहून वेगवेगळ्या जिल्ह्यांचा दौरा सुरू केला आहे. यात मोहिमेद्वारे ते प्रभावशाली लोकांकडून मागील 30 वर्षांचा अनुभव व भविष्यात काय करता येईल हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतील.
यूथ इम्पॉर्टंस प्रोग्राम -विद्यार्थ्यांवर विशेष फोकस
बिहारचे तरुण रोजगार, एज्युकेशन व वेळेवर सरकारी परीक्षा न होण्यामुळे त्रस्त आहेत. त्यामुळे पीके प्रथम त्यांना आपल्या गोटात ओढण्याचा प्रयत्न करत आ हेत. यात ते स्वतः बिहारच्या विद्यापीठ व महाविद्यालयांत जावून विद्यार्थ्यांशी संवाद साधत आहेत.
पीके 18 ते 45 वर्षांपर्यंतच्या तरुणांची भेट घेतील. यावेळी त्यांची टीम फीडबॅकची ब्लू प्रिंटही तयार करेल. पाटणा विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांची भेट घेवून प्रशांत यांनी या मोहिमेची सुरूवातही केली आहे. पीकेंनी काही दिवसांपूर्वी येथील विद्यार्थी नेत्यांची भेट घेवून भविष्यातील रणनितीवर चर्चा केली होती.
बात बिहार की -30 लाख लोकांशी सोशल कनेक्टिंग
प्रशांतची ही मोहीम 3 वर्ष जूनी आहे. ममता बॅनर्जींसोबत जाणे व कोरोना महामारीमुळे हे अभियान स्थगित झाले होते. पण, आता बात बिहार कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रशांत किशोर लोकांशी सोशल मीडियाशी कनेक्ट होऊन स्थानिक पातळीवर त्यांचे मुद्दे प्रामुख्याने उपस्थित करतील.
बात बिहार की कार्यक्रमांतर्गत आतापर्यंत 11 लाखांहून अधिक लोकांनी नोंदणी केली आहे. प्रशांतच्या टीमने याच कार्यक्रमांतर्गत ट्विटरवर #PKSePucho हॅशटॅगही सुरू केला आहे. यात यूझर्सना बिहारच्या मुद्यावर आपले प्रश्न मांडता येतील.
बंगालच्या स्ट्रॅटजीतून बिहार साधण्याचा प्रयत्न
प्रशांत किशोर यांच्या निकटवर्तियांच्या माहितीनुसार, बिहारमध्ये लागू करण्यात येणारा मास्टर प्लॅन मिशन बंगालशी साधर्म्य असणारा आहे. बंगालमध्ये प्रशांत किशोर यांनी तृणमूल काँग्रेससाठी काम केले होते. तिथे त्यांनी 'दीदींना बोला' व 'द्वारे सरकार' ही खास मोहिम सुरू केली होती.
याशिवाय 'बांग्ला निजे मे के चाय' (बंगालला आपलीच मुलगी हवी आहे) कॅम्पेन स्टार्ट करुन त्यांनी बंगाली अस्मितेलाही हवा दिली होती. त्याच धर्तीवर ते बिहारमध्ये #PKSePucho व जन सुराज अभियान सुरू केले आहे. बंगालसारखे बिहारमध्येही पीकेंनी महिला व तरुणांवर विशेष लक्ष्य केंद्रीत केले आहे.
40 वर्षांखालील 3.6 कोटींहून अधिक मतदार
निवडणूक आयोगाच्या 2020 च्या अहवालानुसार, बिहारमध्ये 40 वर्षांखालील जवळपास 4 कोटी 29 लाख मतदार आहेत. त्यामुळे प्रशांत यापुढे नितीश व लालूंवर एकत्र हल्लाबोल करुन या मतदारांना आपल्या बाजूने ओढण्याचा प्रयत्न करतील.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.