आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Ready To Give Jobs To Punjabis In Government And Private Companies, Channi Government

पंजाब निवडणूक:सरकारी, खासगी कंपन्यांत पंजाबींना नोकरीत आरक्षण देण्याची तयारी, निवडणूक मोडवर चन्नी सरकार

चंदीगड12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पंजाब निवडणूक मोडवर चन्नी सरकार, बेरोजगारांची दखल घेतली जातेय

पंजाबमध्ये सरकारी, बिगर सरकारी नोकऱ्यांमध्ये स्थानिक बेरोजगारांना प्राधान्य मिळावे, यासाठी पंजाब सरकार लवकरच कायदा तयार करणार आहे. मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी यांच्या म्हणण्यानुसार, स्थानिक बेरोजगारांची किंमत चुकवत हिमाचल, हरियाणा आणि दिल्लीच्या तरुणांना रोजगार दिला जाणार नाही. वकिलांच्या टीमसोबत बोलले जात आहे आणि लवकरच याला कायद्याचे रूप दिले जाईल. मुख्यमंत्री म्हणाले, त्यांचा प्रयत्न निवडणुकीच्या आधी १ लाख बेरोजगारांना नोकरी देण्याचा आहे. यासाठी ५ हजार होमगार्ड्‌सची भरतीही केली जाईल. लवकरच कायदा बनवून अधिसूचना जारी केली जाईल. चन्नी म्हणाले, सरकारी आणि खासगी क्षेत्रात १०० टक्के नोकऱ्या स्थानिकांना देण्यावर सरकारचा भर आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत स्थानिकांच्या रोजगाराचा प्रस्ताव आणला जाईल, असे सांगण्यात येते. नुकताच पंजाब पोलिसांत भरतीचा मुद्दा उपस्थित झाला होता, हा एक योगायोग आहे. सुमारे ३०० बिगर पंजाबी पोलिस तैनात आहेत. २०१४, २०१६ आणि २०२१ मध्ये झालेल्या भरतीत घोटाळा झाला. अन्य राज्यांतील तरुणांना पंजाबमध्ये भरती केल्याचे सांगितले.

सिद्धू म्हणाले- पंजाब जास्त कर्जदार, सरकारने दरमहा कमाई सांगावी
कर्जाच्या मुद्‌द्यावर चन्नी सरकारवर निशाणा साधत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू म्हणाले, संपूर्ण देशात पंजाब सर्वात जास्त कर्जदार राज्य आहे. पंजाब बियाँड २०२२ आणि “हकीकत पंजाब दी’ हॅशटॅगअंतर्गत सिद्धूंनी सोशल मीडियावर पंजाबच्या आर्थिक स्थितीवर उत्तर मागितले. पंजाबवर जीडीपीच्या ५०% कर्ज आहे. निम्म्यापेक्षा जास्त खर्च महागड्या कर्जातून चालतो. पंजाबला अशा मूलभूत मुद्द्यांपासून भरकटवू दिले जाणार नाही. सिद्धू म्हणाले, नागरिकांच्या भलाईच्या योजनांवर लावला जाणारा पैसा सरकारच्या कमाईचा आहे की कर्जाचा हे सांगितले पाहिजे. आर्थिक आघाडीवर पंजाब राज्याची स्थिती लवकर न सुधारल्यास गृहयुद्धासारखी स्थिती निर्माण होऊ शकते.

बातम्या आणखी आहेत...