आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Ready To Write A New Script '2022' Presidential Election Will Be Decided By The Results Of The States

निवडणूक 2022:राज्यांच्या निकालाने राष्ट्रपती निवडणुकीसह राज्यसभेसाठी शक्तिसंतुलन ठरणार

नवी दिल्ली / मुकेश काैशिक5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवीन वर्ष नवा राजकीय इतिहास लिहिण्यासाठी सज्ज झाले आहे. जम्मू-काश्मीरमध्ये निवडणूक होऊ घातल्यास ८ राज्यांत विधानसभा निवडणूक हाेणे शक्य आहे. त्यात सुमारे २३ लाख मतदारांना आपली राजकीय पसंती दर्शवण्याची संधी मिळेल. त्यातून एक चतुर्थांश भारतीयांचे मत समजू शकेल. त्याचा परिणाम २०२४ मध्ये लाेकसभा निवडणुकीवरदेखील पाहायला मिळू शकताे. या आठ राज्यांतील १३२ लाेकसभा मतदारसंघात जनतेचा काैलही विधानसभेच्या निवडणुकीत स्पष्ट हाेणार आहे. एवढेच नव्हे तर एक हजारावर नव्या आमदारांची निवड हाेणार आहे. ही प्रक्रिया २०२२ मधील राष्ट्रपती निवडणुकीतील शक्ती संतुलन निश्चित हाेणार आहे. उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, मणिपूर, गाेव्यात वर्षाच्या सुरुवातीला मतदान हाेईल.

गुजरात व हिमाचलमधील निवडणूक नवीन वर्षाच्या अखेरीच्या दाेन महिन्यांत हाेणार आहे. केंद्रशासित जम्मू-काश्मीरमधील निवडणुकीबाबतची स्थिती मात्र अद्याप स्पष्ट झालेली नाही. या निवडणुकीत भाजपची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. भाजपच्या ५०० आमदारांसह सातपैकी सहा राज्यांतील सत्तेचा प्रश्न आहे. सर्व मतदारासंघात पुन्हा सत्ता संपादन करण्याचे भाजपसमाेर आव्हान आहे. आम आदमी पार्टी भाजपचे समर्थन बाजूने वळते करण्याच्या प्रयत्नात आहे. राष्ट्रीय पातळीवर हातपाय पसरण्यासाठी आपची किती तयारी आहे हे नव्या वर्षात स्पष्ट हाेऊ शकेल. आप पंजाबमधील चांगल्या कामगिरीनंतर गाेव्यात खाते उघडणे आणि उत्तराखंड, गुजरात, उत्तर प्रदेशात लाेकाश्रयाचा शाेध घेत आहे. जम्मू-काश्मीर पहिल्यांदा केंद्रशासित प्रदेशाच्या रूपाने सरकार स्थापन करणार आहे. घाटीचा काैल व जम्मूतील शक्तीद्वारे निवडणूक निकाल निश्चित हाेणार आहे. निवडणूक हाेऊ घातलेल्या राज्यांत ३०३ पैकी एक तृतीयांश मतदारसंघ येतात.

बातम्या आणखी आहेत...