आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

देशातील पहिले तंत्रज्ञान:घरात आयसोलेट रुग्णांची रिअल टाइम माहिती मिळेल रुग्णालयात, हृदयाच्या ठोक्यांची व ऑक्सिजनची माहिती अॅपवर

नवी दिल्ली / अमितकुमार निरंजन3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पुण्यातील रुबी हॉलमध्ये मिळणार सुविधा

देशात प्रथमच डॉक्टर कोरोनावर उपचार करण्यासाठी त्यांच्या मोबाइलवर घरात विलगीकरणात राहणाऱ्या रुग्णाच्या हृदय व फुप्फुसाची माहिती देणाऱ्या रिअल टाइम अशा तंत्रज्ञानाचा वापर करण्याची शक्यता आहे. त्याआधारेच डॉक्टर रुग्णांना मोबाइलवर सल्ला देऊ शकतील. जर रुग्ण अथवा त्यांचा नातेवाईक फोन उचलत नसतील तर डाॅक्टर त्यांच्या घरीही जाऊ शकतात. अशा प्रकारच्या तंत्राने लक्षणे न दिसणाऱ्या रोगांवरही उपचार दहापटीने स्वस्त होऊ शकतो. या तंत्राने पुण्यातील सर्वात मोठे रुग्णालय अशी ओळख असलेल्या रुबी हॉल क्लिनिकमध्ये पुढच्या महिन्यापासून उपचार मिळू शकेल. कोरोनावरही अशाच तंत्राचा वापर करू शकतील.

हे उपकरण अभया इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी एलएलपी स्टार्टअपचे सीईओ व संस्थापक व्ही. एस. नागराज यांनी तयार केले आहे. या उपकरणाचे नाव डिजिबीट्स आहे यामुळे ऑक्सिजनचे प्रमाण तपासण्यासाठी पल्स ऑक्सिमीटर उपकरण ब्ल्यूटूथला जोडलेले असते. डिजिबीट्स छातीला लावले जाते. हे दोन्ही उपकरणे एका अॅपला कनेक्ट होतात. हे अॅप रुग्ण रुग्ण व डॉक्टर दोघांकडे असते. ते छातीवर लावलेल्या उपकरणाचा डाटा ब्ल्यूटूथने अॅपमध्ये कनेक्ट होऊन क्लाऊडने डॉक्टरांकडे येते. या अॅपमध्ये येणाऱ्या डाटाची माहिती कोणत्याही प्रदेशात बसलेल्या डॉक्टरांना अॅपद्वारे मिळू शकते. याला खर्चही जास्त लागत नाही. ते दररोज ५०० ते ७०० रुपये दराने किरायाने मिळू शकते. या उपकरणासाठी माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने निधी दिला आहे. या निधीतून असे १०० अॅप तयार करण्यात येत आहेत.

९०%खर्चात होणार कपात, २ हजार रु. येईल खर्च
पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकचे जनरल मॅनेजर सचिन दंडवते यांनी सांगितले, आम्ही या दोन उपकरणे व अॅपची चाचणी घरी विलगीकरणात असलेल्या रुग्णांवर केली आहे. याचे निष्कर्षही खूप चांगले आहेत. सुरुवातीला १०० घरी विलगीकरणात असलेल्यांना उपचार देऊ. रुग्णालयात लक्षणे नसलेल्या भरती केल्यास दररोज २० हजार रुपये लागतात. तर घरी रुग्णांची माहिती या अॅपवर समजेल आणि त्यासाठी दोन हजार रु. दररोज खर्च येईल. आता दीड डझन डॉक्टरांची टीम कोविड रुग्णांवर उपचार करत आहे. तेच लक्षही ठेवतील.