आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बंडखोर आमदारांचा आलिशान हॉटेलात मुक्काम:हॉटेलात 170 खोल्या, स्विमिंग पूल व जिमसह राहण्यासाठी सर्वच लक्झरी सुविधा

सूरत4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सूरतच्या दममस रोडवरील ला मेरिडियन हॉटेल शिवसेनेच्या बंडखोर आमदारांच्या वास्तव्यामुळे चर्चेत आले आहे. पंचतारांकित सुविधांनी सूसज्ज असणारे हे हॉटेल अत्यंत आलिशान आहे. त्यामुळे देशच नव्हे तर परदेशांतील पाहुण्यांनाही हे हॉटेल भूरळ घालते. विशेष म्हणजे मागील IPL हंगामापूर्वी महेंद्रसिंह धोनीचा चेन्नई संघही याच हॉटेलात थांबला होता. तब्बल 170 खोल्यांच्या या हॉटेलात स्विमिंग पूल व जिमसह सर्वच अत्याधूनिक सोईसुविधा आहेत.

हॉटेलमध्ये एका आलिशान हॉलसह एक रेस्टॉरंटही आहे.
हॉटेलमध्ये एका आलिशान हॉलसह एक रेस्टॉरंटही आहे.

मतदारांसाठी संपूर्ण फ्लोअर बूक

ला मेरिडियन हॉटेलच्या तिसऱ्या मजल्यावर महाराष्ट्राचे आमदार थांबलेत. त्यांच्यासाठी हा संपूर्ण मजला यापूर्वीच बूक करण्यात आला होता. त्यामुळे या ठिकाणी कुणालाही प्रवेश नाही. येथील सुरक्षा व्यवस्थाही अत्यंत चोख आहे. विशेषतः सर्वच आमदारांच्या वैयक्तिक आवडी-निवडीची येथे खास काळजी घेतली जात आहे.​​​​​​​

ला मेरिडियनला पूर्वी द ग्रँड भगवती नावाने ओळखले जात होते.
ला मेरिडियनला पूर्वी द ग्रँड भगवती नावाने ओळखले जात होते.

'टीजीबी' समुहाचे होते हॉटेल

ला मेरिडियन हॉटेलला पूर्वी द ग्रँड भगवती नावाने ओळखले जात होते. ला मेरिडियनने एप्रिल 2019 मध्ये ते खरेदी केले. त्यानंतर हॉटेलचे टीजीबी (द ग्रँड भगवती) नाव बदलून ला मेरिडियन करण्यात आले. पण, त्यातील सुविधांत कोणताही बदल झाला नाही. तूर्त या हॉटेलला फाइव्ह स्टार हॉटेल म्हणून ओळखले जात आहे.

हॉटेलचा संपूर्ण तिसरा मजला महाराष्ट्राच्या आमदारांसाठी बूक करण्यात आला आहे.
हॉटेलचा संपूर्ण तिसरा मजला महाराष्ट्राच्या आमदारांसाठी बूक करण्यात आला आहे.

मेरिडियन हॉटेलमध्ये 170 रूम्स, 2 बँक्वेट हॉल, जिम, स्विमिंग पूल, डीलक्स, सुपर डीलक्स, एक्झिक्युटिव्ह रूम्स, प्रीमियम रूम्स आणि स्पेशल सूट्सही आहेत.

बातम्या आणखी आहेत...