आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Record 10 Lakh Devotees Registered For Chardham This Year, Maximum 35 Thousand Devotees Will Go To Kedarnath

तीर्थ:चारधामसाठी यंदा विक्रमी 10 लाख भाविकांची नोंदणी,  सर्वाधिक 35 हजार भाविक केदारनाथला जाणारमनमीत

डेहराडून2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दोन वर्षांनंतर सुरू झालेल्या चारधाम यात्रेसाठी यंदा विक्रमी दहा लाख भाविकांनी नोंदणी केली आहे. यात्रेला सुरू होऊन आठवडाही पूर्ण झालेला नाही. त्यात सर्वाधिक तीन लाख ३५ हजार भाविक केदारनाथ यात्रेवर जातील. नोंदणीचा हा ऑनलाइन किंवा काउंटरवरील आकडा आहे. त्याव्यतिरिक्त थेट धाम गाठणाऱ्यांची संख्याही हजारोंच्या घरात आहे.

उत्तराखंड सरकारच्या म्हणण्यानुसार गेल्या वर्षीचा विक्रम यंदा मोडला आहे. बद्रीनाथ केदारनाथ मंदिर समितीचे अध्यक्ष अजेंद्र अजय म्हणाले, ऑल वेदर रोडचे काम पूर्ण झाले आहे. या मार्गामुळे प्रवाशांचा वेळ वाचणार आहे. दोन वर्षांपासून भाविकांना यात्रेवर येता आले नव्हते. चारधामच्या यात्रेच्या निमित्ताने यंदा तीन कोटींहून जास्त भाविकांना दर्शन घेता येणार आहे. तसे झाल्यास हा सार्वकालीन विक्रम राहील.

बातम्या आणखी आहेत...