आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Record 14721 New Patients In Last 24 Hours, 3.95 Lakh Cases So Far India Corona Virus Update

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

देश कोरोना:संक्रमितांचा आकडा 4 लाखांच्या पुढे; फक्त 9 दिवसात एक लाख रुग्ण वाढले

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

देशातील कोरोना संक्रमितांचा आकडा 4 लाख 566 झाला आहे.आज तमिळनाडुत 2396, राजस्थान 158, मध्यप्रदेश 142 रुग्ण सापडले आहेत. फक्त 9 दिवसात संक्रमितांचा आकडा 3 वरुन 4 लाख झाला. देशात 11 जून रोजी 2 लाख 98 हजार 289 रुग्ण होते, आज 4 लाख 566 झाले. रुग्ण संख्येच्या बाबतीत भारत जगात चौथ्या नंबरवर आहे.

दरम्यान, दिल्लीचे उप राज्यपाल अनिल बैजल यांनी सर्व कोरोना रुग्णांचा 5 दिवस क्वारेंटाइन सेंटरमध्ये राहण्याचा निर्णय परत घेतला आहे. त्यांनी सांगितले की, आता त्या रुग्णांना क्वारेंटाइन सेंटरमध्ये ठेवले जाणार नाही, ज्यांना क्लीनिकल असेसमेंटनंतर रुग्णालयात भरती न होण्यास सांगितले आहे. ज्या रुग्णात हलके लक्षण असेल, त्यांना होम आयसोलेशनमध्ये ठेवले जाईल.

दिल्ली चे उप मुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी स्टेट डिजास्टर मॅनेजमेंट अथॉरिटीच्या बैठकीनंतर ही माहिती दिली. एक दिवसापूर्वीच उप राज्यपालांनी सर्व रुग्णांना क्वारेंटाइन सेंटरमध्ये ठेवण्याचे आदेश जारी केले होते. याविरोधात हाय कोर्टात याचिका दाखल झाली होती. 

बातम्या आणखी आहेत...