आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायंदा आतापर्यंत गव्हाच्या दरात ३० टक्के पेक्षा जास्त वाढ झाली. शुक्रवारी तो २,८४२ रुपये प्रतिक्विंटल एवढ्या विक्रमी पातळीवर गेला होता. यामुळे पोळी व बिस्किटासारखे रोज लागणारे पदार्थ महागतील. सामान्यत: गव्हाच्या दराच्या तुलनेत पिठाच्या दरात वेगाने वाढ होते. गेल्या तीन महिन्यांत गहू १५.२५ टक्के महागला तर गव्हाचे पीठ १८-१९% महागले.
विशेष म्हणजे वाढते दर नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकारने मे महिन्यात गहू निर्यातीवर बंदी घातली होती, तरीही दर वाढत राहिले. मात्र ही तेजी कायम राहण्याची शक्यता कमी आहे. आयआयएफएल सिक्युरिटीजचे उपाध्यक्ष अनुज गुप्ता यांनी सांगितले, डिसेंबरनंतर गव्हाचे दर कमी होतील. यंदा देशात गव्हाचे उत्पादन गेल्या वर्षाच्या तुलनेत १५-२०% वाढण्याची शक्यता आहे. चांगला दर मिळाल्याने शेतकऱ्यांनी गव्हाची लागवड वाढवली आहे. त्यामुळे भाव कमी होऊ शकतो. यामुळे सामान्यांची काळजी मिटेल.
पुढे पीक चांगले होईल केडिया अॅडव्हायझरीचे संचालक अजय केडिया यांच्यानुसार, देशात चांगले पीक होईल. ७.५६ लाख हेक्टरवर गव्हाची लागवड झाली. हे गेल्या वर्षाच्या या कालावधीत लागवडीच्या ६.०९ लाख हेक्टर जास्त आहे. गव्हाचे उत्पादन विक्रमी पातळीवर जाण्याचा अंदाज आहे.
सरकार करू शकते दोन उपाय 1. शासकीय गोदामातील काही गहू खुल्या बाजारात उपलब्ध केला जाऊ शकतो. 2. गहू आयातीवर ४०% कर घटवला किंवा पूर्ण हटवला जाऊ शकतो.
दर वाढण्याची चार मोठी कारणे 1. शासकीय साठा अर्धा झाला : ऑक्टोबरपर्यंत शासकीय गोदामांमध्ये गव्हाचा साठा कमी होऊन २.२७ कोटी टन झाला. एक वर्षापूर्वी तो ४.६९ कोटी टन होता. 2. शासकीय खरेदी खूप कमी : यंदा गव्हाची शासकीय खरेदी गेल्या वर्षाच्या तुलनेत ५७% कमी झाली. यामुळे पुरवठा वाढवण्याचे सरकारकडे पर्याय कमी आहेत. 3. उत्पादन कमी : यंदा देशात सुमारे ९.५ कोटी टन गव्हाच्या उत्पादनाची शक्यता आहे. मात्र १०.६८ कोटी टन उत्पादन राहण्याचा सरकारचा अंदाज होता. 4. पुरवठ्यात अडचणी : रशियात गव्हाचे चांगले उत्पादन झाले, मात्र युक्रेनसोबत युद्ध पुन्हा भडकल्याने त्याच्या पुरवठ्याबाबत अडचणी वाढल्या आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.