आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:घरगुती एअर कंडिशनर्सची विक्रमी विक्री, विक्रीने एप्रिलमध्येच आलांडली महामारीपूर्वीची पातळी

नवी दिल्ली17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

उन्हाळ्याचे लवकर आगमन आणि त्यानंतरच्या उष्णतेच्या लाटेमुळे व्होल्टास, पॅनासोनिक, हिताची, एलजी आणि हायरसारख्या उत्पादकांनी एप्रिलमध्ये विक्रमी वाढ नोंदवून निवासी एअर कंडिशनर्सची मागणी वाढवली आहे. कोविड-१९ साथीच्या आजाराच्या दुसऱ्या लाटेमुळे व्यवसायांवर परिणाम झाला तेव्हा कमी मागणी आणि गेल्या वर्षी एप्रिलमधील कमी आधार यामुळे विक्रीलाही चालना मिळाली आहे. या वर्षी एअर कंडिशन विक्रीने एप्रिल २०१९ मध्ये महामारीपूर्वीची पातळी ओलांडली आहे, असे उद्योग क्षेत्रातील कंपन्यांनी म्हटले आहे.“खूप कडक उन्हाळा आणि २०२१ वर्षातील लाे-बेसमुळे एप्रिल २०२२ मध्ये, एसी उद्योगाने गेल्या वर्षीच्या तुलनेत अभूतपूर्व वाढ पाहिली आहे. या संपूर्ण क्षेत्राने सर्वाधिक तिप्पट वाढ झाली आहे.

घरगुती एअर कंडिशन बाजारपेठ ७ ते ७.५ दशलक्ष युनिट्सची
कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स अँड अप्लायन्सेस मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या (सेमा) मते, भारतीय निवासी एअर कंडिशन बाजार पेठ ७ ते ७.५ दशलक्ष युनिट्सची असण्याची अपेक्षा आहे आणि १५ पेक्षा जास्त कंपन्या यात कार्यरत ा आहेत. हा विभाग अजूनही सरासरी २५ टक्के स्थानिक मaल्यवर्धनासह आयातीवर जास्त अवलंबून आहे. सरकारने गेल्या वर्षी एअर कंडिशनरच्या सुट्या भागांच्या उत्पादनासाठी ३,८९८ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसाठी २६ अर्ज मंजूर केले होते.

बातम्या आणखी आहेत...