आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नायब राज्यपाल आणि केजरीवाल यांच्‍यातील वाद:आपकडून 97 काेटी रुपये वसूल करा, दिल्ली नायब राज्यपालांचे आदेश

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

दिल्लीचे नायब राज्यपाल व्ही.के. सक्सेना व मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यातील वाद वाढत चालले आहेत. आपने सरकारी तिजाेरीतील सुमारे ९७ काेटी रुपयांची उधळपट्टी राजकीय प्रचार-प्रसिद्धीवर केली आहे. हे पैसे आपकडून वसूल केले जावेत, असे आदेश सक्सेना यांनी मुख्य सचिवांना दिले आहेत.

अधिकृत जाहिरात एजन्सीवरील निगराणीची जबाबदारी सरकारी अधिकाऱ्यांकडे द्यावी, असे निर्देशही नायब राज्यपालांनी दिले. परंतु नायब राज्यपाल अशा प्रकारचा निर्णय घेऊच शकत नाहीत, असे आपचे म्हणणे आहे. सूत्रांच्या म्हणण्यानुसार दिल्ली सरकारच्या माहिती व प्रसारण संचालनालयाच्या म्हणण्यानुसार नियमांचा भंग करणाऱ्या जाहिरातींवर ९७.१४ काेटी रुपये खर्च करण्यात आले. डीआयपीने त्यासाठी ४२.२६ काेटी रुपयांहून जास्त पैसे दिले आहेत. आणखी ५४.८७ काेटी रुपये बाकी आहेत. २०१५ चे सुप्रीम काेर्टाचे आदेश, २०१६ चे दिल्ली हायकाेर्टाचे आदेश व २०१६ चे सीसीआरजीएच्या आदेशाच्या पार्श्वभूमीवर नायब राज्यपालांचा आदेश आला आहे.

बातम्या आणखी आहेत...