आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

400 फूट खोल बोअरवेलमध्ये अडकलेल्या मुलाचा मृत्यू:रेस्क्यू टीमने 84 तासांनंतर मृतदेह काढला, 39 फूट खोलवर अडकला होता

इर्शाद हिंदुस्तानी, बैतूल4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मध्य प्रदेशातील बैतूलमध्ये बोअरवेलमध्ये अडकलेल्या 6 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. 84 तासांनंतर मुलाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. पहाटे 3 वाजता बचाव पथक मुलाच्या जवळ पोहोचले होते. पहाटे 5 वाजेपर्यंत मृतदेह बाहेर काढता आला. सात वाजता मृतदेह बैतूल येथील जिल्हा रुग्णालयात आणण्यात आला. 5 डॉक्टरांचे पथक मृतदेहाचे पीएम करत आहे.

जिल्हाधिकारी अमनबीर सिंह बैंस यांनी सांगितले की, बोअर 400 फूट खोल आहे. सुमारे 39 फूट खोलीवर सदरील मुलगा अडकला होता. रेस्क्यू टीमने बोअरला समांतर 44 फूट खोल खड्डा खोदला. यानंतर 9 फूट आडवा बोगदा खोदण्यात आला होता.

शिक्षणमंत्री इंदरसिंह परमार यांनी बैतूलमधील बचाव स्थळाची पाहणी केली. बोअरवेलमध्ये पडलेल्या मुलाच्या पालकांशीही त्यांनी संवाद साधला.
शिक्षणमंत्री इंदरसिंह परमार यांनी बैतूलमधील बचाव स्थळाची पाहणी केली. बोअरवेलमध्ये पडलेल्या मुलाच्या पालकांशीही त्यांनी संवाद साधला.
बोअरवेलला समांतर खड्डा खोदण्यात आला. यानंतर 9 फूट आडवा बोगदा खोदण्यात आला.
बोअरवेलला समांतर खड्डा खोदण्यात आला. यानंतर 9 फूट आडवा बोगदा खोदण्यात आला.

एनडीआरएफ आणि डीएसआरएफचे 61 जवान बचावकार्यात

बचाव कार्यावर देखरेख करणारे होमगार्ड कमांडंट एसआर आझमी यांनी सांगितले की, तन्मय बोअरवेलमध्ये 39 फूटांवर अडकला होता. मुलांची साधारण तीन ते चार फूट उंची लक्षात घेऊन आम्ही ४४ फुटांपर्यंत खड्डा खोदला आहे. NDRF आणि DSRF चे 61 जवान बोगदा बांधण्यात गुंतले होते.

बोअरवेलला समांतर 44 फूट खोल खड्डा खोदण्यात आला. यानंतर येथून बोगदा करण्यात आला.
बोअरवेलला समांतर 44 फूट खोल खड्डा खोदण्यात आला. यानंतर येथून बोगदा करण्यात आला.

मदत करण्यात चार गावातील लोक सहभागी

घटनास्थळी मांडवी गावासह आजूबाजूच्या चार गावांतील लोकांनी मदतीचा हात पुढे केला. गावकऱ्यांनी मोफत जेवणापासून 200 हून अधिक लोक बचावकार्यात सहभागी होण्यापर्यंत सर्व प्रकारची व्यवस्था केली. तन्मयला हसत-खेळताना पाहणं एवढाच त्यांचा हेतू होता.

6 वर्षांचा तन्मय हा इयत्ता दुसरीत शिकत होता. खेळता खेळता तो बोअरवेलच्या खड्ड्यात पडला होता. सुरुवातीला तन्मयला रात्री दोरीने ओढले गेले, पण पुन्हा खाली पडला.
6 वर्षांचा तन्मय हा इयत्ता दुसरीत शिकत होता. खेळता खेळता तो बोअरवेलच्या खड्ड्यात पडला होता. सुरुवातीला तन्मयला रात्री दोरीने ओढले गेले, पण पुन्हा खाली पडला.

बोअरवेलच्या आतून मुलाचा आवाज आला

बैतूल जिल्ह्यातील आठनेर येथील मांडवी गावात मंगळवारी सायंकाळी पाचच्या सुमारास हा अपघात झाला. 6 वर्षांचा तन्मय इतर मुलांसोबत खेळत होता. दरम्यान, तो शेजारच्या बोअरवेलमध्ये पडला. आवाज दिल्यावर बोअरवेलच्या आतून मुलाचा आवाज आला. यावर कुटुंबीयांनी तत्काळ बैतूल व आठनेर पोलिसांना माहिती दिली.

तन्मयची 11 वर्षांची बहीण निधी साहू म्हणाली की, "आम्ही लपाछपी खेळत होतो. भावाला सांगितले चल आता घरी जाऊया. तो उड्या मारत-मारत आला. बोअरवर पोते ठेवलेले होते. त्याने ते धरले मात्र, मी जाईपर्यंत तो खाली गेला होता. 5 वाजण्याच्या सुमारास तो पडला, असे आई रितू साहू सांगतात. त्याने आवाजही दिला. त्यानंतर त्याचा श्वास घेण्याचा आवाज येत होता.

बातम्या आणखी आहेत...