आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातरूणांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी आली आहे. जम्मू काश्मिर सेवा निवड मंडळाच्या वतीने (JKSSB) विविध सरकारी विभागांमध्ये 772 रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना जारी केली आहे. या अंतर्गत सहाय्यक, संगणक सहाय्यक, निरीक्षक, मेकॅनिक, इलेक्ट्रीशियन, ड्रायव्हर सह अनेक पदासांठी भरती केली जाईल. अर्ज करण्याची प्रक्रिया 14 ऑगस्टपासून सुरू होणार असून 14 सप्टेंबरपर्यंत चालणार आहे. पात्र उमेदवार https://jkssb.nic.in/ या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन अर्ज करू शकतात.
12 सरकारी विभागांमध्ये भरती
भरती प्रक्रियेद्वारे 12 विविध शासकीय विभागातील 772 पदे भरण्यात येणार आहेत. या पदांसाठी शैक्षणिक पात्रता पदानुसार वेगळी आहे. ज्या उमेदवारांनी 10 वी, 12 वी आणि B.Sc आणि ITI उत्तीर्ण केलेले आहेत ते पदानुसार अर्ज करू शकतील.
श्रेणीनुसार वयोमर्यादेत भिन्नता
JKSSB च्या या पदासाठी अर्ज करण्यासाठी श्रेणीनुसार वयोमर्यादा निश्चित केली आहे. अनआरक्षित प्रवर्गासाठी 40 वर्षे तर आरक्षित प्रवर्गासाठी वयोमर्यादा 43 वर्षे निश्चित करण्यात आली आहे. या पदांसाठी वयाच्या ४८ वर्षापर्यंत माजी सेवानिवृत्त अर्ज करू शकतील.
निवड लेखी परीक्षेद्वारे होईल
या पदांवरील निवड लेखी परीक्षेद्वारे केली जाईल ज्यात वस्तुनिष्ठ प्रश्न असतील. यासोबतच काही पदांसाठी कौशल्य/शारीरिक चाचणी देखील घेतली जाईल.
अर्ज-फी घ्या जाणून
या पदांसाठी अर्ज करण्यासाठी सामान्य श्रेणीतील उमेदवारांना 550 रुपये शुल्क भरावे लागेल. तर SC/ST, PWD आणि EWS श्रेणींना 450 रुपये अर्ज शुल्क ऑनलाइन पद्धतीने जमा करावे लागेल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.