आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Reforms Are Being Made In All Areas For The Progress Of The Country: Prime Minister Narendra Modi

नवी दिल्ली:देशाच्या प्रगतीसाठी सर्व क्षेत्रांत सुधारणा केल्या जात आहेत : पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पाच ते सहा वर्षांत सात नव्या आयआयएम स्थापन

देशाच्या विकासासाठी प्रत्येक क्षेत्रात आवश्यक त्या सुधारणा केल्या जात असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. सोमवारी म्हैसूर विद्यापीठाच्या शताब्दी पदवी प्रदान समारंभात पंतप्रधान मोदी व्हर्च्युअल पद्धतीने बोलत होते.

मोदी म्हणाले की, गेल्या ६-७ महिन्यांत तुम्ही वेगवान बदल पाहिले असतील. कृषी, अंतराळ, संरक्षण, विमान कामगार, सर्वच विकासासाठी आवश्यक बदल केले जात आहेत. राष्ट्रीय शिक्षण धोरणावर ते म्हणाले की, स्किलिंग, रिस्किलिंग आणि अपस्किलिंग सध्याची आवश्यकता होती व यावरच धोरण आधारित आहे. उच्च शिक्षण, विशेषत: अभियांत्रिकी आणि वैद्यकीय क्षेत्रात मुलींची संख्या वाढल्याचा उल्लेख करत म्हणाले, उच्च शिक्षणात जास्त मुली येत असल्याचे जाणून मला आनंद होत आहे. हे देशाच्या विकासासाठी चांगले आहे. आयआयटी प्रवेशात त्यांची संख्या २०१४ मधील ८% वरून मागील सहा वर्षांत वाढून ३०% झाली आहे.

२०१४ नंतर १५ एम्स :

देशात स्थापन झालेल्या संस्थांबाबत मोदी म्हणाले , पाच ते सहा वर्षांत सात नव्या आयआयएम स्थापन झाल्या तर त्याआधी देशात १३ आयआयएम होत्या. तसेच सुमारे सहा दशकांत देशात ७ एम्स होत्या. २०१४ नंतर दुप्पट म्हणजे १५ एम्स स्थापन झाले आहेत किंवा सुरू होण्याच्या तयारीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...