आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देशाला फायदा:सुधारणांचा दीर्घावधीत देशाला फायदा, सुधारणांच्या मार्गाने उद्दिष्टापर्यंत जाऊ शकतो : मोदी

बंगळुरू10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अग्निपथ योजनेवरून सुरू असलेल्या आंदोलनात पंतप्रधान मोदी म्हणाले की, काही निर्णय आणि सुधारणा सुरुवातीस भले वाईट वाटतात, मात्र दीर्घावधीत त्याचा देशाला फायदा होतो. सुधारणांचा मार्गच आपल्याला नव्या उद्दिष्टाकडे घेऊन जाऊ शकतो. पंतप्रधान दोन दिवसांच्या कर्नाटक दौऱ्यावर आहेत. राज्यात २७,००० कोटींच्या योजनांच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. पंतप्रधान म्हणाले, सरकारी उपक्रम असो की खासगी, दोन्ही देशाची संपत्ती आहे. त्यामुळे सर्वांना समान संधी मिळाली पाहिजे.

सरकारने ८ वर्षांत अंतराळ आणि संरक्षण क्षेत्र तरुणाईसाठी खुले केले आहे. त्यावर दशकांपासून सरकारची एकाधिकारशाही होती. ड्रोन आणि प्रत्येक दुसऱ्या तंत्रज्ञानात आम्ही तरुणांना काम करण्याची संधी देत आहोत. सरकारने जी जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान बनवले आहे, त्यात तरुणांनी आपली कल्पना सांगावी. गेल्या ८ वर्षांत १०० हून जास्त अब्ज डॉलरच्या कंपन्या उभ्या राहिल्या. त्यात दर महिन्यात नव्या कंपन्या जोडल्या जात आहेत.

बातम्या आणखी आहेत...