आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादिल्लीतील एका हॉटेलचा रिसेप्शनिस्ट काश्मिरी तरुणाला रूम देण्यास नकार देत असल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. हा प्रसंग सदर व्यक्तीने आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला. तरुणाने या नकाराचे कारण विचारले असताना हॉटेलच्या महिला कर्मचाऱ्याने असे दिल्ली पोलिसांचे आदेश असल्याचे स्पष्ट केले.
काश्मिरी तरुणाने ओयो संकेतस्थळावरुन हॉटेलची रूम बूक केली होती. पण, जेव्हा तो या हॉटेलवर पोहोचला, तेव्हा त्याला खोली देण्यास स्पष्ट नकार देण्यात आला.
आम्ही असे कोणतेही आदेश दिले नाही -दिल्ली पोलिस
दुसरीकडे, दिल्ली पोलिसांनी या प्रकरणी आपली प्रतिमा डागाळत असल्यामुळे एक निवेदन जारी केले आहे. त्यात त्यांनी पोलिस प्रशासनाकडून काश्मिरी तरुणांना हॉटेलमध्ये थांबण्यास मनाई करणारे कोणतेही आदेश जारी करण्यात आले नसल्याचे स्पष्ट केले आहे. 'काही जण हेतुपुरस्सर चुकीची माहिती देऊन दिल्ली पोलिसांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करत आहे. आम्ही अशा प्रकारचे कोणतेही आदेश जारी केले नाहीत. व्हिडिओ तयार करणारा व्यक्ती त्याच भागात दुसऱ्या एका हॉटेलात थांबला आहे. यासाठी त्यांना शिक्षाही होऊ शकते', असे ते म्हणाले.
घटना काश्मीर फाईल्सवरुन प्रेरित
ही घटना 22 मार्चची आहे. पण, जम्मू काश्मीर विद्यार्थी संघटनेचे राष्ट्रीय प्रवक्ते नासीर खूहेमी यांनी यासंबंधीचा व्हिडिओ ट्विट केल्यानंतर ती उजेडात आली. नासीरने ही घटना द काश्मीर फाईल्सचा परिणाम असल्याचा आरोप केला. काश्मीर फाईल्सनंतरचे हे वास्तव. दिल्लीच्या हॉटेलने ओळखपत्र व अन्य दस्तावेज अतानाही काश्मिरी व्यक्तीला खोली देण्यास नकार दिला. काश्मिरी असणे गुन्हा आहे काय? असे त्यांनी म्हटले आहे.
ओयोने आपल्या प्लॅटफॉर्मवरुन हॉटेल वगळले
दुसरीकडे, हॉटेल अॅग्रिगेटर ओयो रुम्सने हा व्हिडिओ उजेडात आल्यानंतर सदर हॉटेलला आपल्या सेवेतून वगळले आहे. आमच्या रुम्स व आमचे मन सर्वांसाठी खूले आहेत. या प्रकरणी आम्ही केव्हाच तडजोड करणार नाही. हॉटेलने असे का केले? याचा तपास केला जाईल. घटना आमच्या निदर्शनास आणून दिल्याबद्दल आभार, असे ओयोने म्हटले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.