आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लोक तयार, लस तरी द्या सरकार!:18+ च्या लसीकरणाची नोंदणी तर सुरू झाली, परंतु माहिती अपूर्ण

नवी दिल्ली9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कोविनवर दोन तासांत 5 कोटी लोकांची धडक, नोंदणी 79.65 लाखांची
  • कुणाला स्लॉट मिळाला नाही, तर कुणाला सेंटरच कळले नाही

बुधवार सायंकाळी ४ पासून १८ ते ४४ वयोगटातील लोकांसाठी लसीकरणाची नोंदणी काेविन पोर्टलवर सुरू झाली. मात्र, हा प्रारंभ होताच या अभियानाला धक्के बसू लागले. पहिल्या तासात ५ कोटी लोक Cowin.gov.in वर नोंदणीसाठी धडकले. अनेकदा सर्व्हर जाम झाल्याने लोकांची अडचण झाली. यात फक्त ७९.६५ लोकांची नोंदणी होऊ शकली. ज्यांची नोंदणी झाली त्यांच्यापैकी बहुतांश लोकांना पूर्ण माहितीच मिळाली नाही. अनेकांना लसीकरणाची तारीख कळली नाही. अनेकांना मेऐवजी ऑगस्टची तारीख मिळाली. ज्यांना तारीख मिळाली त्यापैकी अनेकांना सेंटर कोणते हेच माहीत नाही. सरकारी सूत्रांनुसार, अनेक राज्यांतही सेंटर्सची यादी, लसीची उपलब्धता याची माहिती लोकांपर्यंत पोहोचू शकलेली नाही.

दिव्य मराठी पडताळणी : राज्यांनी कंपन्यांना ऑर्डर तर दिली, मात्र किमतीबाबत संशय असल्याने पुरवठा कधी होईल हेच माहीत नाही
राज्यांनी १ मेपासून लसीकरण अभियान सुरू करण्यासाठी कंपन्यांना ऑर्डर दिली, मात्र कंपनीने जाहीर केलेल्या किमतीतच लस मिळणार की किंमत कमी करण्यासाठी राज्यांनी केलेल्या मागणीवर विचार होणार हे कळू शकले नाही. ज्या ऑर्डर देण्यात आल्या त्या कंपनी कधीपर्यंत पुरवठा करणार हे पण स्पष्ट नाही. मोठ्या राज्यांची स्थिती अशी-

मुंबईत ४५ वर्षांवरील लोकांसाठीही ४७ हजार कुप्यांचाच साठा, गुरुवारी लसीकरण होणार नाही
मुंबईत डोसचा पुरेसा साठा नसल्याने गुरुवारी ७३ पैकी ४० केंद्रांवर लसीकरण होणार नाही. इतर ३३ खासगी केंद्रांवरही दुसऱ्या डोसच्या लोकांनाच प्राधान्य असेल. मुंबईत बुधवारी दुपारी २ वाजेपर्यंतच लसीकरण झाले. त्यानंतर फक्त ४७,७४० कुप्या एवढाच साठा शिल्लक होता.

महाराष्ट्राला २० मेपर्यंत लस देऊ शकणार नाहीत कंपन्या, बिहारला देण्यास असमर्थता व्यक्त केली
महाराष्ट्र : १८ ते ४४ वर्षांच्या लोकांची संख्या ५.७१ कोटी आहे. सरकारने १.३० कोटी डोसची ऑर्डर दोन्ही कंपन्यांना दिली आहे. पण दोन्ही कंपन्यांनी २० मेच्या आधी देण्यास असमर्थता व्यक्त केली.
बिहार : १८ ते ४४ वर्षाच्या लोकांची संख्या ५.४७ कोटी आहे. सरकारने १ कोटी डोसची ऑर्डर सीरमला दिली. कंपनीने पुरवठ्यास असमर्थता व्यक्त केली.
उत्तर प्रदेश : १८ ते ४४ वयोगटाची लोकसंख्या ९.१५ कोटी आहे. सरकारने १ कोटी डोसची ऑर्डर दिली. मात्र, लस टप्प्याटप्प्याने मिळेल. तारीखही निश्चित नाही.
झारखंड : १८ ते ४४ वयोगटाची लोकसंख्या १.५७ कोटी आहे. सरकारने ५० लाख डोसची ऑर्डर दिली. कधी मिळेल हे निश्चित नाही.
गुजरात : १८ ते ४४ वयोगटाची लोकसंख्या ३.२५ कोटी आहे. सरकारने १.५० कोटी डोसची ऑर्डर दिली. कधी मिळेल हे निश्चित नाही.
राजस्थान : १८ ते ४४ वयोगटाची लोकसंख्या ३.५ कोटी आहे. सरकारने ३.७५ कोटी डोसची ऑर्डर सीरमला दिली. १ मेपर्यंत मिळणे कठीण आहे, हे मंत्र्यांनीही मान्य केले आहे.
छत्तीसगड : १८ ते ४४ वयोगटाची लोकसंख्या १.२० कोटी आहे. सरकारने सध्या कंपनीला ५० लाख डोसची ऑर्डर दिली. कधी मिळेल हे अजून निश्चित नाही.

सीरम आता राज्यांना ४०० ऐवजी ३०० रुपयांत देणार एक डोस
सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने राज्यांसाठी लसीची किंमत ४०० रुपयांवरून कमी करून ३०० रुपये प्रतिडोस केली आहे. अर्थात केंद्र सरकारसाठी निश्चित केलेल्या १५० रु. दरापेक्षा या डोसची किंमत दुप्पट आहे.

बातम्या आणखी आहेत...