आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Registration Starts For 18+ Vaccination, But Information Incomplete; Nobody Found The Center If Nobody Got The Slot

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

1 मेपासून लसीकरणाचा चौथा टप्पा:18+ लसीकरणासाठी पहिल्या दिवशी 1.33 कोटी रजिस्ट्रेशन झाले; कुणाला स्लॉट मिळाले नाही तर कुणाला सेंटरविषयी माहिती नाही

नवी दिल्ली9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सर्व्हर क्रॅश झाल्यानंतर लोकांना अडचणींचाही सामना करावा लागला.

कोविन पोर्टलवर बुधवारी संध्याकाळी 4 वाजेपासून 18 ते 44 वर्षांच्या लोकांच्या लसीकरणाचे रजिस्ट्रेशन सुरू झाले आहे. यासाठी पहिल्या दिवशी 1.33 कोटी लोकांनी रजिस्ट्रेशन केले. सुरुवातीच्या दोन तासांमध्ये 5 कोटी लोक Cowin.gov.in वर रजिस्ट्रेशन करण्यासाठी आले होते. यामुळे सर्व्हर क्रॅश झाल्यानंतर लोकांना अडचणींचाही सामना करावा लागला.

ज्यांचे रजिस्ट्रेशनही झाले, त्यामधील अनेकांना संपूर्ण माहितीही मिळाली नाही. अनेक लोकांना लसीकरणाची तारीख सांगण्यात आली नाही तर अनेकांना मे ऐवजी ऑगस्टची तारीख मिळाली. ज्यांना तारीख मिळाली त्यांच्यातील अनेकांना हे सांगितले नाही की, कोणत्या सेंटरवर कोणती व्हॅक्सीन मिळेल. सरकारी सूत्रांनी सांगितले की, अनेक राज्यांनी सध्या सेंटर्सची लिस्ट आणि व्हॅक्सीनच्या उपलब्धतेविषयी माहिती दिलेली नाही.

अपॉइंटमेंटही प्रायव्हेट आणि राज्य सरकारच्या सेंटर्सच्या उपलब्धतेवर मिळेल

  • सरकारने सर्वात पहिले माहिती देत सांगितले होते की, रजिस्ट्रेशन प्रक्रिया 28 एप्रिलपासून सुरू होईल. मात्र कोणतीही वेळ ठरवलेली नव्हती.
  • अशा वेळी लोकांनी 27 एप्रिलच्या रात्री 12 वाजेनंतरपासूनच कोविन पोर्टल, आरोग्य सेतू किंवा उमंग अॅपवर रजिस्ट्रेशन करण्याचे प्रयत्न सुरू केले. मात्र रजिस्ट्रेशन तेव्हा सुरू होऊ शकले नाही. यानंतर लोक सोशल मीडियावर आपला राग व्यक्त करु लागले.
  • यानंतर 28 फेब्रुवारीला सकाळी सरकारकडून वेळेविषयी माहिती देण्यात आली. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले होते की, 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या सर्व लोकांना कोविड-19 ची व्हॅक्सीन घेण्यासाठी संध्याकाळी 4 वाजेपासून कोविन पोर्ट्ल या आरोग्य सेतूवरुन रजिस्ट्रेशन करता येईल शकेल.
  • अधिकाऱ्यांनी सांगितले की, व्हॅक्सीन घेण्यासाठी अपॉइंटमेंट घेणे गरजेचे असेल. थेट येऊन लस घेण्याची परवानगी दिली जाणार नाही. अपॉइंटमेंटही प्रायव्हेट आणि राज्य सरकारच्या सेंटर्सच्या उपलब्धतेच्या आधारावच मिळेल. म्हणजेच राज्यांमध्ये एक मेपासून व्हॅक्सीनेशनसाठी तयार सेंटर्सच्या आधारावर लोकांना अपॉइंटमेंट दिली जाईल.
बातम्या आणखी आहेत...