आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Regulations For Food | How Much Salt, Sugar To Eat; You Have To Write On The Envelope

खाद्यपदार्थांसाठी नियमावली:मीठ, साखर किती खायचे; पाकिटावर लिहावे लागेल

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आरोग्यासाठी हानिकारक पाकिटबंद खाद्य पदार्थांवर बंदी घालण्याच्या दिशेने भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (एफएसएसएआय) काम करत आहे. यासाठी फ्रंट ऑफ पॅकेज लेबलिंग (एफओपीएल) मापदंड कडक केले जाणार आहेत. एका अधिकाऱ्याने सांगितले की, सर्व पाकिटबंद खाद्य पदार्थांवर स्टार रेटिंगशिवाय अतिरिक्त “सावधगिरीचा इशारा’ अनिवार्य करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.

अधिकारी म्हणाले, जसे दारूच्या बाटलीवर किंवा सिगारेटच्या पाकिटावर हानिकारक असल्याचा इशारा दिला जातो तसेच पॅकेज्ड पदार्थांच्या पाकिटावर एका दिवसात किती फॅट, साखर किंवा मीठ खाऊ शकता, हे लिहावे लागेल. एफएसएसएआयची यासंदर्भात कंपन्या आणि भागीदारांसोबत चर्चा सुरू आहे. एफओपीएलची शिफारस पहिल्यांदा २०१४ मध्ये एफएसएसएआयने २०१३ मध्ये स्थापन केलेल्या तज्ज्ञ समितीने केली होती. नियमांच्या मसूद्याला गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये मंजूरी देण्यात आली होती. तथापि, याचा विरोध पॅकेज्ड फूड निर्मात्यांनी केला होता.

बातम्या आणखी आहेत...