आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Relationship Of Name To Age; Ram And Sunita Are Most Common Among 40 45 Age Group, Pooja Neha And Rahul Deepak Common Among 18 25.

विश्लेषण:नावाचे वयाशी नाते; 40-45 वर्षीय लोकांत राम आणि सुनीता सर्वाधिक, 18-25 मध्ये पूजा-नेहा अन् राहुल-दीपक कॉमन

नवी दिल्ली16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये या बातमीतील नावांपैकी एकही नाव नाही अशी क्वचितच एखादी व्यक्ती असेल. त्यामुळेच तर त्यांना कॉमन नावाचा दर्जा मिळाला आहे. महिलांत ‘सुनीता’ आणि पुरुषांत ‘मोहंमद’ नाव सर्वाधिक लोकांचे आहे. दिल्लीतील ६८ लाख पुरुषांत १,६१,८५९ जणांचे नाव मोहंमद आणि ५४ लाख महिलांपैकी ९९,२७३ जणींचे नाव सुनीता आहे. सोशलकॉप्स या डेटा अॅनालिटिक्स स्टार्टअपने दिल्लीच्या मतदार यादीतून १८ वर्षांवरील लोकांचे ‘पहिले नाव’ आणि वय यातील नाते तपासले तेव्हा अनेक रंजक बाबी आढळल्या.

{नाव ऐकताच मनात एक प्रतिमा तयार होते, उदा. विद्यावती किंवा तारावती, ऐकून असे वाटते की, वृद्ध महिला असावी. विश्लेषणात ‘विद्यावती’ नावाच्या महिलांचे सरासरी वय ७९, ‘तारावती’चे ७५ वर्षे आढळले. मोनिका, लक्षिता किंवा तान्या नावाच्या महिला ३० वर्षांखालील आहेत.

{संतोष, कमलेश आणि राजेश यांसारखी १५ नावे अशी आढळली, जी पुरुष-महिला दोघांचीही आहेत. दिल्लीत अशी नावे ठेवणाऱ्यांचा आकडा जवळपास ५ हजारपर्यंत आहे. {अभिनेत्रींचे नावही प्रचलित. रवीना, करिश्मा, काजोल, ट्विंकल नावाच्या मुलींचे सरासरी वय २०-२३ वर्षे आहे. ऐश्वर्या नावाच्या मुलींचे २१ वर्षे.

{१९७० च्या दशकात अमिताभ हे नाव सर्वात लोकप्रिय होते, पण त्यानंतर त्याची लोकप्रियता घटली. क्रिकेटमध्ये सचिन आणि बॉलीवूडमध्ये शाहरुखच्या एंट्रीनंतर या नावांत वेगाने वाढ झाली. {महिलांमध्ये शांती आणि लक्ष्मी, तर पुरुषांत राम आणि मदन सदाबहार आहे. १९ ते ९६ वर्षांपर्यंत वय असलेल्यांतही या नावांचे लोक सहज आढळतात. {दिल्लीतील ५४ लाख महिलांत एक लाख आणि ६८ लाख पुरुषांपैकी १.२ लाख लोकांची नावे समान आहेत. युनिक नावाचे (जे कमीत कमी १० लोकांचे आहे, कारण काही नावांत टायपिंगची चूक आहे) पुरुष १६ हजार आणि महिला १४ हजार आहेत.

बातम्या आणखी आहेत...