• Home
  • National
  • Relaxation in Lockdown after 2 months, Parks open, crowds of citizens for walks

नवी दिल्ली / दोन महिन्यांनंतर मोकळ्या हवेत श्वास..; उद्याने खुली, वॉकसाठी नागरिकांची गर्दी

  • 65 वर्षांहून जास्त, 10 वर्षांहून कमी वयाच्या मुलांना प्रवेशबंदी

वृत्तसंस्था

May 22,2020 09:39:00 AM IST

नवी दिल्ली. लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात सक्तीत अंशत: सवलत दिली आहे. देशभरात त्याचा परिणाम दिसतोय. दिल्लीत दोन महिन्यानंतर उद्यानांचे टाळे उघडण्यात आले. तेव्हा सकाळी सात वाजेपासून नागरिकांनी वॉकसाठी गर्दी केली होती. एनडीएमसी भागातील उद्याने-बागा खुल्या करण्याचा निर्णय दिल्ली पालिकेने घेतला आहे. त्यामुळे लोकांना चालणे, व्यायाम करण्याची सुविधा मिळेल. नेहरू पार्क, लोधी गार्डन, तालकटोरा गार्डनचा समावेश आहे. सकाळी ७ ते १० पर्यंत व दुपारी ३.३० ते सायंकाळी ६.३० पर्यंत ही उद्याने खुली राहतील. प्रशासनाने उद्यानात येणाऱ्या नागरिकांसाठी मास्क अनिवार्य केले आहेत. वॉकदरम्यान लोक नियमांचे पालन करत होते. उद्यानात आेपन जिमची परवानगी नाही. दिल्लीच्या लोधी उद्यानात सकाळी सात वाजता लोक आले होते. जास्तवेळ खुली हवा मिळेल, असे त्यांचे म्हणणे होते.


६५ वर्षांहून जास्त, १० वर्षांहून कमी वयाच्या मुलांना प्रवेशबंदी

६५ वर्षीय नागरिक तसेच १० वर्षांहून कमी वयाच्या मुलांना उद्यानांत प्रवेश दिला जाणार नाही. गृह मंत्रालयाच्या सूचनेनुसार हा नियम लागू करण्यात आला आहे. त्याशिवाय गंभीर आजारी असलेल्यांना देखील उद्यानात प्रवेश नाही. दिल्लीत ११ हजाराहून जास्त लोकांना संसर्ग झाला आहे. १७६ लोकांचा त्यात मृत्यू झाला. ५ हजाराहून जास्त लोकांवर यशस्वी उपचार झाले आहेत.

X