आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:सिद्धूंची सुटका; म्हणाले, लोकशाहीला बेड्या

पतियाळा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

१९८८ च्या मारहाण प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने शिक्षा सुनावल्यानंतर १० महिने १५ दिवसांचा तुरुंगवास भोगून नवज्योतसिंग सिद्धू यांची शनिवारी सायंकाळी सुटका झाली. पंजाब काँग्रेसचे माजी अध्यक्ष सिद्धू गडद निळ्या रंगाचे जॅकेट, पठाणी सूट घालून तुरुंगाबाहेर आले. तुरुंगात लिहिलेली लाल रंगाची डायरी हातात घेऊन बाहेर येताना हाताची मूठ आवळत आपल्या खास शैलीत नमस्कार करून समर्थकांचे आभार मानले. सिद्धू यांनी प्रवेशद्वारावरच पंजाब आणि केंद्र सरकारवर हल्ला चढवला. केंद्र सरकार ढासळलेल्या कायदा-सुव्यवस्थेचा बहाणा बनवत पंजाबमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करू इच्छित आहे. राहुल गांधींना क्रांतिकारक संबोधत ते म्हणाले, लोकशाही साखळदंडात आहे. संस्था गुलाम आहे. सिद्धू २२ मे २०२२ रोजी शरण आले. त्यांची विहित मुदतीच्या ४८ दिवस आधी सुटका झाली. त्यांनी वर्षभरात एकही सुटी घेतली नाही.