आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Reliance Industries Acquires Majority Stake In New York's Luxury Hotel Mandarin Oriental For USD 98.15 Million

मुकेश अंबानींचे झाले मँडरिन ओरिएंटल:न्यूयॉर्कचे 5-स्टार लग्जरी हॉटेल 729 कोटी रुपयांमध्ये केले खरेदी, याचे एका रात्रीचे भाडे 10 लाखांपेक्षा जास्त

नवी दिल्ली10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांची कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने न्यूयॉर्कचे प्रतिष्ठित लक्झरी हॉटेल मँडरिन ओरिएंटल 9.81 कोटी डॉलर (जवळपास 729 कोटी रुपये) मध्ये विकत घेतले आहे. 2003 मध्ये बांधलेले, मँडरीन ओरिएंटल हे 80 कोलंबस सर्कल, न्यूयॉर्क येथे असलेले एक लोकप्रिय लक्झरी हॉटेल आहे. हे सेंट्रल पार्क आणि कोलंबस सर्कलच्या अगदी जवळ आहे. रिलायन्सने गेल्या वर्षी ब्रिटनचा आयकॉनिक कंट्री क्लब आणि गोल्फ रिसॉर्ट स्टोक पार्क 57 मिलियन पाउंड (सुमारे 592 कोटी रुपये) मध्ये विकत घेतले होते.

रिलायन्सने स्टॉक एक्सचेंज फायलिंगमध्ये दिली माहिती
कंपनीने स्टॉक एक्सचेंज फायलिंगमध्ये म्हटले, 'रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) ची पूर्ण मालकीची सहाय्यक कंपनी असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रियल इन्व्हेस्टमेंट्स अँड होल्डिंग्स लिमिटेड (RIIHL) ने आज कोलंबस सेंटर कॉर्पोरेशनचे संपूर्ण जारी केलेले शेअर भांडवल सुमारे 98.1 कोटी डॉलरच्या इक्विटी मोबदल्यासाठी विकत घेतले आहे. जी कॅमेन आयलँड्समध्ये सामिल एक कंपनी आहे आणि मँडारिन ओरिएंटल न्यूयॉर्कमध्ये 73.37 टक्के हिस्सेदारीची अप्रत्यक्ष मालक आहे. मँडारिन ओरिएंटल हे न्यूयॉर्क शहरातील प्रतिष्ठित लक्झरी हॉटेल्सपैकी एक आहे.

मँडरिन ओरिएंटलच्या रुम रेट्स
मँडरिन ओरिएंटल, न्यूयॉर्कमधील 5-स्टार लग्जरी हॉटेल आहे. यामध्ये एका रात्रीचा खर्च 745 डॉलर (जवळपास 55,000 रुपये)पासून 14,000 डॉलर (जवळपास 10.40 लाख रुपये)पर्यंत आहे. यामध्ये वेगवेगळ्या लोकेशनचे व्ह्यू असणाऱ्या रुमपासून लग्जरी सुइट आहेत. हॉटेलमध्ये प्रेसिडेंशियल सुइट, सुइट 5000 मिळतील.

मँडरिन ओरिएंटलमध्ये एका रात्रीचे भाडे

रूमएका रात्रीचा खर्च
हडसन रिवर व्यू रूम745 डॉलर (जवळपास 55,000 रुपये)
सेंट्रल पार्क व्यू रूम845 डॉलर (जवळपास 62,000 रुपये)
प्रीमियर सेंट्रल पार्क व्यू रूम945 डॉलर (जवळपास 70,000 रुपये)
हडसन रिवर व्यू सुइट1995 डॉलर (जवळपास 1.48 लाख रुपये)
सेंट्रल पार्क व्यू सुइट2295 डॉलर (जवळपास 1.70 लाख रुपये)
प्रीमियर सेंट्रल पार्क व्यू सुइट2695 डॉलर (जवळपास 2 लाख रुपये)
सेंट्रल पार्क वेस्ट सुइट3995 डॉलर (जवळपास 3 लाख रुपये)
न्यूयॉर्क स्काई लाइन सुइट9500 डॉलर (जवळपास 7 लाख रुपये)
ओरिएंटल सुइट14,000 डॉलर (जवळपास 10.40 लाख रुपये)

न्यूयॉर्कचे मँडरीन ओरिएंटल हे जगप्रसिद्ध हॉटेल आहे. या हॉटेलने AAA फाइव्ह डायमंड हॉटेल, फोर्ब्स फाइव्ह स्टार हॉटेल आणि फोर्ब्स फाइव्ह स्टार स्पा यासह अनेक पुरस्कार जिंकले आहेत. रिलायन्स फाइलिंगनुसार, 2018 मध्ये त्याचे राजस्व 115 मिलियन अमेरिकी डॉलर, 2019 मध्ये 113 मिलियन अमेरिकी डॉलर आणि 2020 मध्ये 15 मिलियन अमेरिकी डॉलर इतकी होती.

अंबानी हॉटेल उद्योगात पाय रोवत आहेत
मुकेश अंबानी हळूहळू हॉटेल इंडस्ट्रीत आपले पाय रोवत आहेत. त्यांनी ब्रिटनचा प्रसिद्ध आणि आयकॉनिक कंट्री क्लब स्टोक पार्कही विकत घेतला आहे. 300 एकरांवर बांधलेला हा क्लब अंबानींनी 592 कोटी रुपयांना (570 कोटी पाउंड) विकत घेतला आहे. हे अधिग्रहन रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडची सहाय्यक कंपनी रिलायन्स इंडस्ट्रियल इन्व्हेस्टमेंट्स अँड होल्डिंग्स लिमिटेड (RIIHL) ने केले आहे.

स्टोक पार्क आतापर्यंत ब्रिटिश राजघराण्याच्या मालकीचे होते. अनेक वर्षांपासून ते विकण्याचा प्रयत्न केला जात आहे. येथे 49 आलिशान खोल्या, 21 मेंशन आणि 28 पवेलियन आहेत. सर्वांकडे 5AA रेड स्टार रेटिंग आहे. ते कॅपेबिलिटी ब्राउन आणि हम्फरी रेप्टन यांनी डिझाइन केले होते. हे पार्क बिट्रेनचे राजा जॉर्ज थर्ड याचे वास्तुविशारद जेम्स वॅट यांनी प्रायव्हेट प्लेस म्हणून बांधले होते. यामध्ये अनेकदा सेलिब्रिटींच्या कॉन्सर्ट केल्या जातात.

बातम्या आणखी आहेत...