आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई सर्कलमध्ये रिलायन्स जिओची सेवा डाउन आहे. त्यामुळे मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईत जिओची मोबाईल आणि इंटरनेट सेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे. जिओ युजर्ससोबत संपर्कही होऊ शकत नाहीये. अनेक युजर्सनी सोशल प्लॅटफॉर्मवर जिओच्या नेटवर्कची माहिती शेअर केली आहे. इतकेच नव्हे तर जिओ फायबर सेवेतील समस्यांची चर्चा देशभरातून समोर येत आहे.
दुसरीकडे, नॉन-जिओ नंबर असलेल्या वापरकर्त्यांना पॅचिंग कॉलमध्ये समस्या येत आहेत. वृत्तानुसार, जिओने मुंबईतील नेटवर्क बंद केले आहे. हा बिघाड कशामुळे झाला हे अद्याप समजू शकलेले नाही.
देशभरातील जिओ फायबर वापरकर्त्यांना येतायेत संदेश
एकीकडे जिओचे नेटवर्क मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईत डाउन झाले आहे, तर दुसरीकडे देशभरातील जिओ फायबरवरही याचा परिणाम झाला आहे. मध्य प्रदेशातील जिओ फायबर ग्राहकांनाही कंपनीकडून सेवा बंद झाल्याचा संदेश मिळत आहे. ही सेवा संध्याकाळी 7 वाजेपर्यंत दूर केली जाईल, असेही कंपनीने संदेशात स्पष्ट केले आहे.
ट्विटरवर यूजर्स करताहेत तक्रार
मुंबईतील रिलायन्स जिओच्या अनेक वापरकर्त्यांनी ट्विटरवर कॉल येत असल्याची माहिती दिली आहे. त्यांना इंटरनेट सेवा वापरता येत नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यांना 'Not registered on network' असे संदेश मिळत आहेत. काही वापरकर्त्यांचे म्हणणे आहे की त्यांना गेल्या तीन दिवसांपासून नेटवर्कमध्ये समस्या येत आहेत.
ऑक्टोबरमध्ये 8 तास त्रस्त होते ग्राहक
ऑक्टोबरमध्ये रिलायन्स जिओच्या नेटवर्कबद्दल ग्राहक त्रस्त झाले होते. ग्राहकांना ना कॉल करता येत होता आला ना इंटरनेट वापर करु शकत होते. कंपनीशी संबंधित सूत्रांनी सांगितले की, जिओची सेवा देशभरात खंडित झालेली नाही. जिओची सेवा काही राज्यांमध्येच बंद होती.
त्यानंतर देशाच्या विविध भागातून जिओच्या नेटवर्कमध्ये समस्या असल्याच्या तक्रारी आल्या. मध्य प्रदेश, छत्तीसगड, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, कर्नाटक या राज्यांतील लोक अधिक नाराज झाले. जिओच्या नेटवर्कमधील या समस्यांनंतर काही मिनिटांतच ट्विटरवर #jiodown ट्रेंड होऊ लागला होता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.