आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जिओ टॉवर तोडफोड प्रकरण:रिलायन्सने म्हटले - कंत्राटी शेतीशी आमचा काहीही संबंध नाही, कंपनीने उच्च न्यायालयात याचिका केली दाखल

नवी दिल्ली22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कृषी कायद्याविरोधात सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान रिलायन्स जिओच्या मोबाइल टॉवर्सना लक्ष्य केले जात आहे. या आंदोलनात रिलायन्स आणि अदाणींच्या उत्पादनांचा विरोध केला जात आहे. त्यामुळे पंजाबमध्ये रिलायन्स जिओचे 1500 हून अधिक टॉवर तोडण्यात आले आहेत. यावर कंपनीने एक निवेदन जारी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. कंपनीचा कंत्राटी शेतीशी काही संबंध नाही असे या निवेदनात म्हटले आहे. तसेच राज्य सरकारने या प्रकरणात दखल देण्याचे आवाहन कंपनीने केले आहे.

कंपनीने काय म्हटले?

  • रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड, रिलायन्स रिटेल लिमिटेड (RRL), रिलायन्स जिओ इन्फोकॉम लिमिटेड (RJIL) आणि रिलायन्स संबंधित इतर कोणताही कंपनी खासगी किंवा कंत्राटी शेती करत नाही. तसेच भविष्यात या व्यवसायात प्रवेश करण्याची कंपनीची कोणतीही योजना नाही, असे कंपनीकडून सांगण्यात आले आहे.
  • "कॉर्पोरेट" किंवा "कंत्राटी" शेतीसाठी रिलायन्स किंवा रिलायन्सच्या सहाय्यक कंपनीने हरियाणा / पंजाब किंवा देशातील अन्य कोणत्याही भागात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या कोणतीही जमीन विकत घेतली नाही. किंवा भविष्यात असे करण्याची आमची काही योजना नाही.
  • रिलायन्स रिटेल ही भारतातील संघटित किरकोळ व्यवसायातील आघाडीची कंपनी आहे. कंपनी अन्न, धान्य, फळे, भाज्या आणि दररोज वापरल्या जाणार्‍या वस्तू, वस्त्र, औषधे, इलेक्ट्रॉनिक उत्पादने देशातील अन्य ब्रँड, उत्पादक आणि पुरवठादार यांच्या विविध ब्रॅण्डच्या सर्व प्रकारच्या उत्पादनांची विक्री करते. शेतकऱ्यांकडून अयोग्य लाभ घेण्यासाठी कंपनीने कधीच दीर्घकालीन खरेदी करार केले नाहीत, आणि भविष्यातही असे होणार नाही.
  • 130 कोटी भारतीयांचे पोट भरणारे शेतकरी अन्नदाता आहेत आणि आम्ही त्यांचा सन्मान करतो. रिलायन्स आणि त्याचे भागीदार शेतकऱ्यांना समृद्ध आणि सक्षम बनविण्यासाठी कटिबद्ध आहेत. म्हणूनच कंपनी व त्याचे सहकारी कष्टकरी व समर्पणाने उत्पादित शेतकर्‍यांना त्यांच्या उत्पादनांचे योग्य व नफा मिळवून देण्यासाठी पूर्णपणे पाठिंबा देतात. रिलायन्सला कायमस्वरुपी शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवायचे आहे आणि या उद्दीष्ट्यासाठी कार्य करण्यासाठी वचनबद्ध आहे.

रिलायन्सने प्रतिस्पर्धी कंपन्यांवर केला आरोप

रिलायन्सने जारी केलेल्या निवेदनात असे म्हटले की, दोन्ही राज्यांतील कंपनीचे मोबाइल टॉवर्स पाडण्यामागे प्रतिस्पर्धी कंपन्यांचा हात आहे. कंपनीने यापूर्वी दूरसंचार विभागात तक्रार केली आहे. तथापि, कंपनीने कोणत्याही प्रतिस्पर्धी कंपनीचे नाव घेतले नाही. परंतु या तक्रारीनंतर एअरटेल आणि व्होडाफोन आयडिया (Vi) यांनी हे आरोप निराधार असल्याचे म्हटले आहे. या कंपन्यांनी या विषयाबाबत दूरसंचार विभागाला पत्रे देखील पाठवली आहेत.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser