आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी आपला १६ लाख कोटींहून अधिक असलेला व्यावसायिक वारसा पुढील पिढीकडे कसा सोपवतील याकडे आगामी वर्षांत अनेकांचे लक्ष आहे. या महत्त्वाच्या नेतृत्व परिवर्तनावरून जोरदार चर्चा सुरू आहे. अर्थात एक गोष्ट निश्चित की हे बहुप्रतीक्षित कॉर्पोरेट वारसा हस्तांतरण किमान तीन सुपरस्टार बिझनेस तयार करूनच होईल. ६४ वर्षीय मुकेश अंबानी यांच्यासाठी कोणताही वाद न होता सहजपणे हा वारसा आपल्या उत्तराधिकाऱ्यांकडे सोपवणे महत्त्वाचे आहे.
वडील धीरूभाई अंबानी यांचे २००२ मध्ये निधन झाले तेव्हा त्यांनी मृत्युपत्र किंवा वारसदार नेमला नव्हता. त्यानंतर लहान बंधू अनिल अंबानी यांच्याशी मुकेश यांचा संपत्तीवरून वाद झाला. तो पुन्हा होऊ नये याची काळजी मुकेश घेतील. या स्थितीत मुख्य रिलायन्स इंडस्ट्रीला एका ट्रस्टच्या स्वरूपात बदलण्यावर विचार केला जाऊ शकतो. याबाबत ब्लूमबर्गने एक बातमीही दिली होती. त्यानुसार, मुकेश अंबानी संपत्तीच्या वाटणीत वॉलमार्ट इंकच्या वॉल्टन कुटुंबीयांसारखी पद्धत वापरू शकतात. या संभाव्य ट्रस्टच्या मंडळात मुकेश अंबानी, त्यांची पत्नी नीता आणि तीन मुले आकाश, ईशा आणि अनंत यांचा समावेश होऊ शकतो. संपूर्ण कुटुंब संयुक्तरीत्या संपूर्ण साम्राज्य सांभाळू शकते.
सध्याच्या ऑइल आणि पेट्रोकेमिकल, टेलिकॉम व रिटेल बिझनेसचे विभाजन करण्यापेक्षा हा उत्तम पर्याय ठरू शकतो. याचे कारण म्हणजे, सध्या रिलायन्स विद्यमान पारंपरिक इंधनापेक्षा क्लीन एनर्जीकडे वळत आहे. सॅनफोर्ड सी बर्नस्टेनचे समीक्षक नील बेव्हेरिज म्हणतात, रिलायन्सला हे शक्य झाले तर मूल्य व कमाईच्या अधिक संधी आहेत. ज्या प्रकारे ऑइल रिफायनरीने रिलायन्सला सर्वात अग्रेसर टेलिकॉम कंपनी होण्यास मदत केली त्याच प्रकारे नवीन पिढीसाठी ग्रीन एनर्जी, रिटेल आणि डिजिटल बिझनेसमध्ये अंबानी उतरतील.
मोबाइल इंटरनेट, रिटेल व न्यू एनर्जी हे तिन्ही सुपरस्टारचे भक्कम उमेदवार
गुगलसोबत भागीदारी केलेला रिलायन्स जिओ प्लॅटफॉर्म सध्या भक्कम स्थितीत आहे. अर्थात, रिटेलमध्ये रिलायन्सचा मार्ग सोपा नाही. रिलायन्सच्या रिटेल बिझनेसमध्ये सध्या अमेझॉनची प्रमुख स्पर्धा आहे. फ्यूचर ग्रूपच्या अधिग्रहणाचा मुद्दा सध्या अडकून पडला आहे. तर, न्यू एनर्जीमध्ये त्यांना गौतम अदानी यांच्याशी स्पर्धा करावी लागेल. अदानी २०३०पर्यंत जगातील सर्वात मोठे अपारंपरिक ऊर्जेचे निर्माते ठरू शकतात. अंबानी यांनी या क्षेत्रात येत्या तीन वर्षांत ७४.३ हजार कोटींच्या गुंतवणुकीची योजना आखली आहे. अनेक अधिग्रहणाच्या योजना आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.