आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Religious Institutions The World's Fourth Largest Economy, 10% Of The Land In Their Possession

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पृथ्वी वाचवण्यासाठी यूएन धर्माला शरण:धर्मगुरू होणार इको योद्धा, धार्मिक संस्था जगातील चौथी अर्थव्यवस्था, 10% जमीनही त्यांच्या ताब्यात

नवी दिल्ली / रितेश शुक्ल3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • जगभरातील धार्मिक लोकांना पर्यावरणाशी जोडून घेण्यासाठी यूएनईपीचे ‘फेथ फॉर अर्थ’ अभियान

हवामान बदल या शतकातील सर्वात मोठे आव्हान आहे. संयुक्त राष्ट्र पृथ्वीला वाचवण्यासाठी आता धर्माच्या आश्रयाला आले आहे. यूएन पर्यावरण कार्यक्रमांतर्गत (यूएईपी) ‘फेथ फॉर अर्थ’ अभियान सुरू केले आहे. जगभरातील धार्मिक संघटना, धर्मगुरू आणि आध्यात्मिक नेत्यांच्या मदतीने २०३० पर्यंत पृथ्वीच्या ३०% भागाला नैसर्गिक परिस्थितीत रूपांतर करण्याचा यामागील हेतू आहे. या कार्यक्रमाचे संचालक डॉ. इयाद अबू मोगली सांगतात की, हवामान बदल मानव जातीसाठी सर्वात मोठा धोका आहे. तरीही जगातील बहुतांश लोक पर्यावरणाबाबत संवेदनशील होऊ शकलेले नाहीत.

हवामानातील बदल रोखण्याचे सर्व प्रयत्नांच्या निष्कर्षातून आपण या मतापर्यंत आलो आहोत की, धर्मच ती शक्ती आहे, जी जगातील मोठ्या लोकसंख्येला पर्यावरण योद्धा बनवू शकते. ते सांगतात, विज्ञान आकडेवारी देऊ शकते, मात्र श्रद्धाच पृथ्वीला वाचवण्याची इच्छा निर्माण करू शकते. डॉ. इयाद यांचे म्हणणे आहे की, विज्ञान आणि धार्मिक श्रद्धा यांच्यात तसाच संबंध आहे, जसा ज्ञान आणि अंमलबजावणीत आहे. एकाशिवाय दुसरा अपुरा आहे. हाच ‘फेथ फॉर अर्थ’ माेहीम सुरू करण्यामागचा मूळ विचार आहे. हा मूळ विचार कसा आला? याबाबत डॉ. इयाद सांगतात की, २०१७ मध्ये यूएनच्या बैठकीत १९३ देशांनी आगामी दशकासाठी तीन उद्दिष्टे ठरवली आहेत. पहिले गरिबी हटवणे, दुसरे सर्वांना शिक्षण देणे आणि तिसरे पर्यावरणाचे रक्षण. या चर्चेतून निष्पन्न झाले की, पर्यावरण रक्षणासाठी जगभरातील धार्मिक संघटनांचे जेवढे योगदान मिळायला हवे तेवढे मिळत नाही. जगातील ८०% लोक धार्मिक नैतिकतेचे पालन करतात यावरून या संघटनांच्या ताकदीचा अंदाज लावता येतो. जर या संघटनांची एकूण संपत्ती एकत्र केली तर ती जगातील चौथी मोठी अर्थव्यवस्था असेल. जगातील १०% जमीन या संघटनांच्या ताब्यात आहे. ६०% शाळा आणि ५०% रुग्णालये धार्मिक संघटनांकडे आहेत. ही ताकद मानव कल्याणासाठी मुख्य प्रवाहात आणण्याच्या हेतूने ‘फेथ फॉर अर्थ’ अभियानाचा जन्म झाला आहे.

यंदा जिनिव्हाच्या धर्म संसदेत इको योद्धाही हाेणार सहभागी
या मोहिमेमुळे पोप फ्रान्सिस, शिया इस्मायली मुस्लिमांचे इमाम ‘इको योद्धा’ झाले आहेत. भारतातील या मोहिमेचे प्रमुख अतुल बगई यांनी सद्गुरू श्री श्री रविशंकर, शिवानीदीदी आणि राधानाथ स्वामींसारख्या धर्मगुरूंसोबत चर्चा सुरू केली आहे. डॉ. इयाद सांगतात की, यंदा जगातील धर्मगुरूंची संसद जिनिव्हात होणार आहे. यात धार्मिक इको योद्धाही येतील. विज्ञान आणि धार्मिक-आध्यात्मिक नैतिकता जोडून या मोहिमेला व्यापक रूप देतील.