आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

अनलॉक :सजली मंदिरे, 8 जूनपासून धार्मिक स्थळे उघडणार, केंद्राकडून गाइडलाइन आली, भाविकांना मास्क वापरणे बंधनकारक

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • सजली मंदिरे, कोठे सॅनिटायझेशन टनेल, कोठे फिजिकल डिस्टन्सिंगसाठी वर्तुळ

देशातील धार्मिक स्थळे भाविकांसाठी खुली करण्यात आल्याची घोषणा व गाइडलाइन जाहीर केल्यानंतर शुक्रवारपासून बहुतांश धार्मिक स्थळांची साफसफाई सुरू करण्यात आली आहेत. गाइड लाइनप्रमाणे तयारी करण्याची व्यवस्था करण्यात येत होती. विविध ठिकाणी असलेली मंदिरे, मशिदी, गुरुद्वारा व चर्चेसच्या बाहेर सॅनिटायझेशनचे टनेल तयार करण्यात येत आहेत. याचा वापर धार्मिक स्थळी प्रवेश करताना होईल. तेथे बहुतांश ठिकाणी धार्मिक स्थळी फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करण्यासाठी वर्तुळे तयार करण्यात येत आहेत. शुक्रवारी दिल्लीतील लोधी रोडवरील साई मंदिर, झंडेवाला मंदिर व मुंबईतील हाजी अली दर्गा, माहिमचा दर्गा व सिद्धिविनायक मंदिर, चेन्नईतील आर. सी. चर्च, पंचकुला येथील नाडा साहिब गुरुद्वारा व भोपाळ येथील माता वैष्णोधाम नवदुर्गा मंदिर आदींची साफसफाई सुरू होती.

दिल्लीच्या मंदिर मार्गावरील सेेंट थॉमस चर्चसुद्धा ८ जूनपासून उघडणार आहे. येथील प्रशासकांनी सांगितले, फिजिकल डिस्टन्सिंगच्या दृष्टीने योजना तयार केली जात आहे. तर दिल्लीच्या हनुमान मंदिराचे महंत जगन्नाथ दास यांनी सांगितले, एकावेळी ५ ते १० भाविकांनाच प्रवेश देण्यात येत आहे. सर्व भाविकांना प्रवेश दारावरील सॅनिटाइझ टनेलमधूनच घ्यावा लागणार आहे.


धार्मिक स्थळांसाठी गाइडलाइन अशा

- प्रवेश करताना हातपाय धुवावे लागतील.

- हात सॅनिटाइझ करावे लागतील.

- प्रत्येक भाविकांची थर्मल स्क्रीनिंग करण्यात येईल.

- प्रसाद व तीर्थ मिळणार नाही.

- मूर्ती, धर्मग्रंथांना स्पर्श करण्याची परवानगी नाही.

- भजन-कीर्तन असे कार्यक्रम होणार नाहीत.

- भाविकांना मास्क वापरणे बंधनकारक

- सर्व भाविकांना किमान ६ फूट अंतर ठेवावेच लागेल.

- जाण्या-येण्यासाठी वेगळे मार्ग असतील.

- फिजिकल डिस्टन्सिंगसाठी असलेल्या चिन्हावरच उभे राहावे लागेल.

- मोबाइलमध्ये आरोग्य सेतू अॅप असणे गरजेचे.

0