• Home
  • National
  • Remains of Vikramaditya temple found in Shriram Janmabhoomi area

अयोध्या / श्रीराम जन्मभूमी परिसरात सापडले विक्रमादित्यकालीन मंदिराचे अवशेष

  • रामलल्लाच्या गाभाऱ्यात 11 मेपासून सपाटीकरण करण्याचे काम सुरू आहे

दिव्य मराठी

May 22,2020 08:11:00 AM IST

अयोध्या. अयोध्येत राममंदिर उभारणीचे काम वेगाने सुरू असून यासाठी परिसरात सपाटीकरणाचे काम सुरू असताना या भागात प्राचीन मंदिराचे अवशेष सापडले आहेत. यात कलश, देवी-देवतांची शिल्पे असलेले दगडी खांब, देवतांच्या मूर्ती, कोरलेले शिवलिंग, प्राचीन विहिरी आणि कमानी यांचा समावेश आहे. वास्तविक, रामलल्लाच्या गाभाऱ्यात ११ मेपासून सपाटीकरण करण्याचे काम सुरू आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर मंदिर बांधकामाची तयारी सुरू करण्यात आली होती. ज्या गर्भगृहात रामलल्ला विराजमान होते ते विक्रमादित्य काळातील मंदिर असल्याचे या पुराव्यांमुळे स्पष्ट झाले असले तरी ज्या मंदिराचे अवशेष सपाटीकरणात सापडले ते त्याच मंदिराचे आहेत की दुसऱ्या मंदिराचे आहेत हे स्पष्ट होऊ शकलेले नाही.X