आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Remedisivir Injections Distribution Parameters; Bombay High Court To Narendra Modi Government

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुंबई उच्च न्यायालयाची केंद्राला नोटीस:देशातील एकूण रुग्णांपैकी 40% रुग्ण एकट्या महाराष्ट्रात, 30% रेमडेसिवीर इंजेक्शन राज्याला मिळायला हवे

नागपूर19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कोर्टाचा केंद्राला सवाल- राज्यांमध्ये रेमडेसिवीरच्या वितरणाचा आधार काय ?

महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यातच कोरोना रुग्णांना दिले जाणारे रेमडेसिवीर इंजेक्शन मिळत नसल्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंपली आहे. आता या वादात उच्च न्यायालयाने उडी घेतली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली आहे. यात कोर्टाने म्हटले की, राज्यांमध्ये रेमटेसिवीर वितरणाचा काय आधार आहे ? एकट्या महाराष्ट्रात एकूण रुग्ण संख्येच्या 40% रुग्ण असून राज्याला मुभलक इंजेक्शन का मिळत नाहीत ? महाराष्ट्राला तेवढे इंजेक्शन मिळण्याचा अधिकार आहे.

यावेळी उच्च न्यायालयाने राज्य सरकारलाही खडसावले आहे. कोर्टाने म्हटले की, अनेक जिल्ह्यांमध्ये मनमर्जीप्रमाणे रेमडेसिवीर वितरीत केले जात आहेत. याशिवाय कोर्टाने राज्य सरकारला विचारले की, 13 आणि 18 एप्रिल रोजी नागपुरला रेमडेसिवीरचे एकही इंजेक्शन का पाठवण्यात आले नाही ?

30% रेमडेसिवीर इंजेक्शन राज्याला मिळायला हवे

या प्रकरणात 'एमिकस'ला सामील करण्यात आले आहे. हे कायद्याचे जानकार असतात, ज्यांचा प्रकरणाशी थेट संबंध नसतो, पण ते न्यायालयाला मदत करतात. एमिकसने कोर्टाला सांगितले की, एफडीए रेमडेसिवीरच्या काळ्याबाजाराची चौकशी करू शकतात. महाराष्ट्रातील वाढता संसर्ग पाहता 30% रेमडेसिवीर इंजेक्शन राज्याला मिळायला हवेत.

रेमडेसिवीरचे योग्य वितरण होत नाही
कोर्टाने म्हटले की, कोविड -19 मुळे परिस्थिती खूप खराब झाली आहे. सध्या जीव वाचवणाऱ्या औषधाची कमतरता आहे. ऑक्सीजन वेळेवर मिळत नाहीये, मेडिकल आणि पॅरामेडिकल स्टाफदेखील कमी आहे. नागपुरात विषाणूचा स्ट्रॉन्ग व्हेरिएंट दिसत आहे. ठाण्यात 2,448 कोरोना बेडवर 5,328 रेमडेसिवीर वायल दिले, पण नागपुरात 8,232 बेडच्या तुलनेत फक्त 3,326 रेमडेसिवीर दिले. ही वितरणाची पद्धत समजण्यापलीकडची आहे. राज्याची समिती रेमेडेसिवीरचे योग्य वितरण करत नाहीये.

सरकार कंपन्यांना निर्देश देऊ शकतात
कोर्टाने पुढे म्हटले की, FDA (फूड अँड ड्रग अॅडमिनिस्ट्रेशन) च्या जॉइंट डायरेक्टरसोबत बैठक झाली. त्यांनी सांगितले की, राज्य स्तरावर एक समिती आहे, जी जिल्ह्यांसाठी इंजेक्शनची संख्या ठरवते. 7 कंपन्या देशात रेमेडेसिवीर सप्लाय करत आहेत. सध्याची परिस्थिती पाहून ज्या ठिकाणी जास्त रुग्ण आहेत, त्या ठिकाणी जास्त इंजेक्शनचा पुरवठा व्हायला हवा. नागपुर अशाच शहरांमध्ये सामील आहे. सरकारने कंपन्यांना निर्देश द्यावेत.

दर तीन मिनिटांत एका रुग्णाचा मृत्यू

महाराष्ट्रात दर तासाला 2,859 लोक संक्रमित होत आहेत आणि दर तीन मिनिटात एका रुग्णाचा मृत्यू होत आहे. मृतांचा एकूण आकडा 60 हजारांच्या पुढे गेला आहे. मागील 24 तासात राज्यात 503 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जगातील 209 देशांपेक्षा जास्त मृत्यू महाराष्ट्रात झालेत.

बातम्या आणखी आहेत...