आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जागरूकता:430 एकरवरील अतिक्रमण हटवून 2 लाख रोपट्यांची लागवड

बीना2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

हे छायाचित्र मध्य प्रदेशातील बीना तालुक्यातील कंजिया गावचे आहे. बेतवा नदीकिनारी वन विभागाने ४३० एकर जमिनीवर सुमारे दोन लाख रोपट्यांची लागवड केली. एक पूर्ण वाढ झालेले झाड दिवसभरात २३० लिटर ऑक्सिजन देते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. भविष्यात एक हेक्टरमध्ये सरासरी २ हजार झाडे असतील. त्यापटीने झाडांमुळे ऑक्सिजन मिळाल्यास १७४ हेक्टरमधून सुमारे ६.९६ कोटी लिटर ऑक्सिजन दररोज मिळू शकेल, असे वन विभागाचे म्हणणे आहे. सिसम, निंब, आवळा, चंदन, पिंपळ, वटवृक्षाची रोपटी लावण्यात आली आहेत. येथील जमिनीवर २०१७ पासून अतिक्रमण होते. ते हटवण्यात आले.

कंटेट : मधुर तिवारी

बातम्या आणखी आहेत...