आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Remove Your Thumb watch Before Going To The Market, Avoid Rushing, Make Digital Payment Only

दिव्य मराठी विशेष:बाजारात जाण्याआधी अंगठ्या-घड्याळ काढून ठेवा, घाई करणे टाळा, डिजिटल पेमेंटच करा

इंदूरएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • सणासुदीचे दिवस, खरेदी करताना सुरक्षित राहणेही गरजेचे

लॉकडाऊननंतर बाजारपेठा उघडल्या आहेत. खरेदीसाठी लोकांची भली गर्दी होत आहे. काेरोना टाळण्यासाठी काळजी घेणे हाच सर्वाेत्तम उपाय आहे. संसर्ग होऊ नये म्हणून कमीत कमी अॅक्सेसरीज जवळ बाळगा. अंगठ्या, घड्याळ घालणे टाळा. त्या कोरोनावाहक ठरतील. मुलांना घरीच ठेवा. कोणती सतर्कता तुम्हाला कोरोनापासून वाचवेल हे जाणून घ्या...

... जेव्हा बाजारात जाल
- पुरेसा वेळ काढून जा. फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करताना उशीर होऊ शकतो. घाईमुळे बाधिताच्या संपर्कात येऊ शकता.
- ज्या दुकानात मास्क न घातलेले लोक असतील तेथे जाऊ नका.
- बाजारात ६ फूट अंतर राखा. सॅनिटायझरची लहान बाटली सोबत ठेवा. एखादा पृष्ठभाग किंवा वस्तूला स्पर्श केल्यास ती कामी येईल.
- ग्लोव्हज घाला. मास्क लावा.
- शक्य असेल तेवढे डिजिटल पेमेंट करा. सुटे पैसे सोबत ठेवा.

...एखाद्याच्या घरी गेल्यास
- कोरोना काळात एखाद्याला घरी बोलावणे आणि दुसऱ्याच्या घरी जाणे टाळा.
- जाणे गरजेचे असेल तर घरात जाऊ नका. बाहेरून बोला. त्यांच्या घरातील वस्तूला स्पर्श करू नका. पाणी किंवा चहाही घेऊ नका. गरज असेल तर डिस्पोजेबल्स वापरा.

... बाजारातून परतल्यावर
- बाजाराची स्लीपर घराबाहेर काढा. घरात दुसरी स्लीपर घाला.
- भाज्या व मोकळे साहित्य मोठ्या भांड्यात टाका. बॅग किंवा पिशवी घराबाहेरच टांगा.
- दुधाच्या पिशव्या व इतर पाकिटे साबण-डिटर्जंटच्या पाण्यामध्ये किमान २० सेकंद ठेवा. नंतर ती साध्या पाण्याने धुऊन वापरा.
- अॅक्सेसरी जसे बेल्ट, पेन, चावी, चष्मा, वॉलेट, मोबाइल बादलीत टाका. सॅनिटाइझ केल्यानंतर त्यांचा वापर करा. स्वत: अंघोळ करा.

डाॅ. व्ही. पी. पांडे, विभागाध्यक्ष, मेडिसिन एमजीएम वैद्यकीय महाविद्यालय | इंदूर

बातम्या आणखी आहेत...