आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Renowned Singer Rajan Mishra Of Banaras Gharana Died In Delhi Hospital, Infected With Corona

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दुःखद निधन:बनारस घराण्याचे प्रसिद्ध गायक पद्मभूषण पंडित राजन मिश्रा यांचे कोरोनामुळे निधन

नवी दिल्ली13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • वडील आणि आजोबांकडून घेतले होते संगीताचे धडे

बनारस घराण्याचे प्रसिद्ध गायक पद्मभूषण पंडित राजन मिश्रा यांचे निधन झाले आहे. त्यांना गंभीर अवस्थेत दिल्लीतील सेंट स्टीफंस हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले होते. राजन मिश्रा यांना कोरोनाची लागण झाली होती. यातच त्यांना ह्रदयविकाराच झटका आल्याचे सांगितले जात आहे.

राजन मिश्रा आणि त्यांचे भाऊ साजन मिश्रा ख्याल शैलीतील गायनासाठी लोकप्रिय होते. या जोडीला 1971 मध्ये भारत सरकारने संस्कृत पुरस्काराने सन्मानित केले होते. यानंतर 1994-95 मध्ये गंधर्व सन्मान, 1998 मध्ये संगीत नाटक अकादमी आणि 2007 पदम्भूषणने सन्मानित करण्यात आले होते. 14 डिसेंबर 2012 ला त्यांना राष्ट्रीय तानसेन पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. त्यांचे आतापर्यंत 20 पेक्षा जास्त अल्बन आले आहेत.

वडील आणि आजोबांकडून घेतले होते संगीताचे धडे

1951 मध्ये जन्म झालेले राजन मिश्रा यांनी आजोबा पंडित बडे राम जी मिश्रा आणि वडील पंडित हनुमान मिश्रा यांच्याकडून संगीताचे धडे गिरवले होते. यानंतर ते 1977 मध्ये दिल्लीला आले. त्यांनी आपला भाऊ साजन मिश्रा यांच्यासोबत 400 वर्षे जुन्या बनारस घरान्यातील परंपरेला पुढे नेले. दोघांनी 1978 मध्ये श्रीलंकेत आपली पहिली कॉन्सर्ट केली होती. यानंतर, जर्मनी, फ्रांस, स्विट्जरलंड, ऑस्ट्रिया, अमेरिका, ब्रिटेन, नीदरलंड, अमेरिका, सिंगापुर, कतर, बांग्लादेशसह अनेक देशात त्यांच्या गायनाचे कार्यक्रम झाले.

बातम्या आणखी आहेत...