आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअब्जाधीश गाैतम अदानी यांच्या समूहाने साेमवारी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या आराेपांना उत्तर दिले. २०२९ पासून आतापर्यंत समूहाच्या कंपन्यांनी आपली हिस्सेदारी विकून २.८७ अब्ज डाॅलर (सुमारे २३,५२५ काेटी रुपये) जमवले. त्यापैकी २.५५ अब्ज डाॅलर (सुमारे २०,९०२ काेटी रुपये) पुन्हा उद्याेगांत गुंतवण्यात आले आहेत, असे कंपनीच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
अदानींच्या शेल कंपन्यांमध्ये अचानक २० हजार काेटी रुपये कसे आहे, असा आराेप करून राहुल गांधी यांनी गेल्या काही दिवसांपासून कंपनीला लक्ष्य केले हाेते. अदानी समूहाच्या म्हणण्यानुसार या काळात अबुधाबी येथील ग्लाेबल स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टमेंट कंपनी, इंटरनॅशनल हाेल्डिंग कंपनी पीजेएससी (आयएचसी) यांनी समुहाच्या कंपन्यांत २.५९३ अब्ज डाॅलर एवढी गुंतवणूक केली. ही गुंतवणूक अदानी इंटरप्रायजेस लि. व अदानी एनर्जी लि. यात करण्यात आली. या दरम्यान गुंतवणूकदारांनी अदानी टाेटल गॅस लि. व एजीईएलमधील भाग विकून २.७८३ अब्ज डाॅलर (सुमारे २२८१२ काेटी रुपये) जमवले. या रकमेला पुन्हा अदानी समुहातील कंपन्यांमध्ये गुंतवण्यात आले. अशा प्रकारचा हिशेब कंपनीने राहुल यांना दिला आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.