आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Representatives Of 109 Member Countries Gather.. 5th Solar Alliance Meeting From 17th, Hosted By India

109 सदस्य देशांचे प्रतिनिधी एकत्र..:पाचव्या सौर आघाडीची बैठक 17 पासून, भारत यजमान

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आंतरराष्ट्रीय सौर आघाडीच्या पाचव्या बैठकीचे यजमानपद भारताकडे आहेत. दिल्लीत १७ ते २० ऑक्टोबर दरम्यान त्याचे आयोजन करण्यात आले आहे. भारताकडे आघाडीचे अध्यक्षपद आहे. १०९ देश संघटनेचे सदस्य आहेत. सौर ऊर्जेबाबत सहकार्य, समन्वय याबाबत सर्व देशांना प्रोत्साहन मिळावे यादृष्टीने हे संमेलन महत्त्वाचे ठरते. गेल्या पाच वर्षांत सर्व सदस्य देशांनी करारानुसार सौर ऊर्जा क्षेत्रात नेमकी काय प्रगती केली आहे, याचा आढावा बैठकीत घेतला जाईल. संमेलनात अनेक तांत्रिक सत्र देखील होतील. वर्ल्ड सोलर टेक्नॉलॉजी रिपोर्ट, वर्ल्ड सोलर मार्केट रिपोर्ट, वर्ल्ड सोलर इन्व्हेस्टमेंट रिपोर्ट देखील जाहीर होणार आहे. अमेरिकेने आंतरराष्ट्रीय सौर आघाडी कराराला दुजोरा दिला आहे.

बातम्या आणखी आहेत...