आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायंदा २६ जानेवारीचा प्रजासत्ताक दिन सोहळा अद््भुत व अभूतपूर्व होणार आहे. स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षात होणाऱ्या या समारंभाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य असलेल्या परेडचे आयाेजन नव्या राजपथावर होईल. सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पांतर्गत विजय चौकातून इंडिया गेटपर्यंत राजपथाच्या पुनर्विकासाचे काम होत असून ते शेवटच्या टप्प्यात आहे. विशेष म्हणजे, पहिल्यांदाच देशभरातून स्पर्धेंतर्गत निवडलेले व्यावसायिक कलाकार यंदा राजपथावर उतरतील. तंत्रज्ञान, स्वदेशी व नावीन्याचा समावेश करण्यासाठी ‘ड्रोन परेड’चा सर्वात अनोखा समावेश झाला आहे. यामुळे ही परेड संस्मरणीय होणार आहे. संरक्षण प्रतिष्ठानच्या अधिकाऱ्यांनी दै. भास्करला सांगितले की, यंदा प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये चार मोठे कार्यक्रम घेण्यात आले आहेत.
संरक्षण मंत्रालयानुसार, सेंट्रल व्हिस्टा प्रोजेक्टअंतर्गत परेडसाठी आवश्यक भाग - राजपथ, लॉन, कालवा, पार्किंग एरिया व इतर जागांची उभारणी पूर्ण झाली आहे. ४ अंडरपास आणि ८ जनसुविधा केंद्र विकसित होणार होते. मात्र त्यांचे काम पूर्ण होऊ शकलेले नाही. ते परेडनंतर सुरू राहील. राजपथावर लॉन व कालव्याच्या किनारी नवे लाइट पोल लावले आहे. परेडदरम्यान व्हीआयपी रहदारी सुरळीत ठेवण्यासाठी कालव्यांवर १६ पक्के पूल उभारले आहेत. शुक्रवारपासून नव्या राजपथावर टप्प्यांत सराव सुरू केली जाईल. १७, १८, २० आणि २१ जानेवारीला रंगीत तालीम होईल. २३ जानेवारीला पहिली फुल ड्रेस रिहर्सल हाेईल. वाढत्या काेरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर राजपथावर किती प्रेक्षकांना परवानगी दिली जाईल, याचा निर्णय झालेला नाही. मात्र सुमारे ३० हजार बाकडे (ब्लीचर्स) तयार आहेत.
३,८७० मधून ५०० कलाकारांची निवड, परेडमध्ये शानदार प्रस्तुती
राजपथावर प्रोफेशनल डान्स ट्रूप्सचेही शो होतील. वंदे मातरम स्पर्धेअंतर्गत ३२३ ग्रुप्सच्या ३,८७० स्पर्धकांतून ५०० डान्सर्सची निवड झाली. ते शानदार नृत्य सादर करतील. वीरगाथा स्पर्धेत राष्ट्रनायकांवर गाणी, निबंध आणि कथा लिहिणारे २५ युवा विजेता निवडले आहेत. तेही परेडमध्ये सहभागी होतील.
ड्रोनद्वारे तिरंगा, संविधान आणि राष्ट्रनायकांना देणार सलामी
परेडसाठी प्रथमच १,००० ड्रोनचा ताफा सज्ज आहे. त्याद्वारे तंत्रज्ञानाचे प्रदर्शन केले जाईल. राजपथाच्या आकाशात ड्रोन्सना एकाच वेळी कंट्रोल करण्याची क्षमता दिसेल. ५ मध्य आशियाई देशांच्या राष्ट्राध्यक्षांपुढे आकाशात तिरंगा, संविधान आणि स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचाही उद््घोष केला जाणार आहे.
समर स्मारकात शहिदांना वंदन : देशासाठी आयुष्याचे बलिदान दिलेल्या शहिदांच्या कुटुंबीयांना प्रजासत्ताकाच्या भावनेच्या अनुरूप देशभरातून बोलावले जात आहे. दिल्लीत इंडिया गेटजवळील समर स्मारकावर ५००० पेक्षा अधिक कुटुंबीयांना एकाच वेळी सन्मानित केले जाईल.
नव्या राजपथाच्या दोन्ही बाजूंना सव्वा-सव्वा किमीचे १५ फूट उंच दोन कॅन्व्हास सजवले जात आहेत. त्यावर युद्धनायक आणि अमृत महोत्सवाच्या थीमवर चित्रकला केली जात आहे. चित्रकारांच्या निवडीसाठी कलाकुंभ आयोजित झाला होता. कॅन्व्हासवरील चित्रकला इतकी अद््भुत आहे की लोकांना त्यापुढे सेल्फी घेण्याचा मोह आवरता येणार नाही.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.