आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Republic Day Parade 2022 : Delhi Rajpath | 73rd Gantantra Diwas Celebrations Latest Photos | Marathi News

प्रजासत्ताक दिन परेड:75 विमानांचा मेगा फ्लायपास्ट, वैमानिकांनी कॉकपिटमधून लाइव्ह स्ट्रीम केले, विनाश फॉर्मेशनमध्ये उडाले 5 राफेल

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आज देश 73 वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे. सकाळी सर्वप्रथम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय युद्ध स्मारकावर पोहोचून देशासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या सैनिकांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट, संरक्षण सचिव अजय कुमार आणि लष्कराच्या तिन्ही शाखांचे प्रमुख म्हणजे लष्कर, हवाई दल आणि नौदलाचे प्रमुख पंतप्रधानांसोबत उपस्थित होते.

15 मिनिटांनी म्हणजेच 10.15 वाजता पीएम राजपथवर पोहोचले. यानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा ताफा घोड्यांवर स्वार होऊन राष्ट्रपतींच्या अंगरक्षकांसह राजपथावर पोहोचला. जिथे पंतप्रधानांनी त्यांचे स्वागत केले. 10.26 वाजता ध्वजारोहण व राष्ट्रगीत झाले. 21 तोफांची सलामी देण्यात आली.

राजपथावर सुमारे 90 मिनिटे परेड चालली. यामध्ये लष्कराकडून महिला पुढे येत असल्याचे चित्र दिसून आले. नौदल, हवाई दल आणि लष्कराच्या महिला अधिकाऱ्यांनी तिरंग्याला सलामी दिली. लेफ्टनंट मनीषा बोहरा यांनी सर्व पुरुष दलाचे नेतृत्व केले. यापूर्वी त्यांनी आर्मी डेच्या दिवशीही हे केले आहे. ऑल मेल आर्मी ऑर्डनन्स रेजिमेंटचे नेतृत्व करणाऱ्या त्या पहिल्या महिला आहेत.

मेगा फ्लायपास्टमध्ये 75 विमानांनी उड्डाण केले
परेडमध्ये 75 विमानांचा मेगा फ्लाय पास्ट करण्यात आला. यादरम्यान कॉकपिटमध्ये बसलेल्या वैमानिकांनी त्याचे थेट प्रक्षेपणही केले. राफेल विमानांनीही राजपथावर गर्जना केली आणि ध्रुव हेलिकॉप्टरने आकाशात तिरंगा फडकवला. विनाश फॉर्मेशनमध्ये 5 राफेल लढाऊ विमानांनी उड्डाण केले. 75 विमानांनी प्रथमच मेगा फ्लायपास्ट केला आहे. स्वातंत्र्याच्या अमृतोत्सवाचे प्रतीक म्हणून हे केले गेले.

अपडेट्स

  • राष्ट्रगीतानंतर 4 Mi-17V5 हेलिकॉप्टरने वाइनग्लास फॉर्मेशनमध्ये परेडदरम्यान फुलांचा वर्षाव केला.
  • राष्ट्रपती रामनाथ कोविंद राजपथवर पोहोचले. यानंतर राष्ट्रगीत आणि 21 तोफांची सलामी देण्यात आली.
  • भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीतील पक्षाच्या मुख्यालयात ध्वजारोहण केले. यानंतर ते म्हणाले की, मी देशवासियांना ७३ व्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देतो. या दिवशी, या देशाला प्रजासत्ताक बनविण्यासाठी ज्यांनी आपले जीवन समर्पित केले त्या महान वीर आणि शूर पुत्रांचे स्मरण करा.
पंतप्रधान नरेंद्र मोदी वारमेमोरियल येथे शहिदांना आदरांजली वाहताना.
पंतप्रधान नरेंद्र मोदी वारमेमोरियल येथे शहिदांना आदरांजली वाहताना.
राजपथवर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे स्वागत करताना पंतप्रधान मोदी.
राजपथवर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे स्वागत करताना पंतप्रधान मोदी.
राजपथावर राष्ट्रगीताच्या वेळी २१ तोफांची सलामी देण्यात आली.
राजपथावर राष्ट्रगीताच्या वेळी २१ तोफांची सलामी देण्यात आली.
जम्मू-काश्मीर पोलिसांचे ASI बाबू राम यांना मरणोत्तर अशोक चक्र प्रदान करण्यात आले. त्यांच्या पत्नी रिता राणी यांनी राष्ट्रपतींकडून ते स्वीकारले.
जम्मू-काश्मीर पोलिसांचे ASI बाबू राम यांना मरणोत्तर अशोक चक्र प्रदान करण्यात आले. त्यांच्या पत्नी रिता राणी यांनी राष्ट्रपतींकडून ते स्वीकारले.
Mi-17V5 हेलिकॉप्टरने परेड सुरू होण्यापूर्वी पुष्पवर्षाव केला. यानंतर परेडची प्रक्रिया सुरू झाली.
Mi-17V5 हेलिकॉप्टरने परेड सुरू होण्यापूर्वी पुष्पवर्षाव केला. यानंतर परेडची प्रक्रिया सुरू झाली.
राजपथावर 1965 आणि 1971 च्या युद्धात पाकिस्तानविरुद्ध लढलेले सेंच्युरियन रणगाडे दिसले.
राजपथावर 1965 आणि 1971 च्या युद्धात पाकिस्तानविरुद्ध लढलेले सेंच्युरियन रणगाडे दिसले.
राफेलची पहिली महिला फायटर पायलट शिवांगी सिंह हवाई दलाच्या चित्ररथावर
राफेलची पहिली महिला फायटर पायलट शिवांगी सिंह हवाई दलाच्या चित्ररथावर
भारतीय नौदलाच्या चित्ररथाचे नेतृत्व लेफ्टनंट प्रीती यांनी केले. त्यांच्यासोबत लेफ्टनंट मयंक होते.
भारतीय नौदलाच्या चित्ररथाचे नेतृत्व लेफ्टनंट प्रीती यांनी केले. त्यांच्यासोबत लेफ्टनंट मयंक होते.
उत्तर प्रदेशच्या चित्ररथामध्ये काशी-विश्वनाथ कॉरिडॉरचा समावेश होता, ज्याचे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले.
उत्तर प्रदेशच्या चित्ररथामध्ये काशी-विश्वनाथ कॉरिडॉरचा समावेश होता, ज्याचे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले.
बातम्या आणखी आहेत...