आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Republic Day Subhash Chandra Bose | Marathi News | Central Govt Big Desicion | Republic Day Celebrations To Begin On January 23, Including Netaji Subhash Chandra Bose's Birthday

केंद्र सरकारचा मोठा निर्णय:आता 23 जानेवारीपासून प्रजासत्ताक दिनाचा सोहळा सुरू होणार, नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीचाही समावेश

नवी दिल्ली11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रजासत्ताक दिनाची सुरुवात आता 24 जानेवारी ऐवजी 23 जानेवारीला होणार आहे. असा मोठा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांची 23 जानेवारीला जयंती असते, त्यापार्श्वभुमीवर हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. सुभाषचंद्र बोस यांचा जन्म 23 जानेवारी 1897 मध्ये झाला होता.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, इतिहास आणि संस्कृतीच्या महत्त्वाच्या बाबी साजरे करण्यावर लक्ष केंद्रित करण्याच्या अनुषंगाने केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे. सरकारने यापूर्वी सुभाषचंद्र बोस यांची जयंती 'पराक्रम दिवस' म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला होता.

तर 14 ऑगस्टला स्मरण दिवस तर 31 ऑक्टोंबरला राष्ट्रीय एकता दिवस तर 15 नोव्हेंबरला जनजातीय गौरव दिवस, 26 नोव्हेंबरला संविधान दिवस आणि वीर बाल दिवस साजरा करणाचा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे. त्यात आता सुभाषचंद्र बोस यांची जयंती प्रजासत्ताक दिनाच्या समारोहात साजरी केली जाणार आहे.

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याशी निगडीत देशभरातील स्थळांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्राने एक योजना आखली आहे. गेल्या वर्षी ऑक्टोंबरमध्ये पीटीआयने सांगितले होते की, 21 ऑक्टोबर 1943 रोजी बोस यांनी जाहीर केलेल्या तात्पुरत्या सरकारच्या स्थापनेच्या वर्धापन दिनानिमित्त पर्यटन मंत्रालय कार्यक्रमांचा भाग म्हणून क्युरेटेड टूरचे नियोजन करत आहे. असे म्हटले होते.

बातम्या आणखी आहेत...