आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
रिपब्लिक TV चे CEO विकास खानचंदानी यांना मुंबई किल्ला कोर्टाने 15 डिसेंबरपर्यंत पोलिस कस्टडीत पाठवण्याचा आदेश दिला आहे. कोर्टाच्या या निर्णयाच्या विरोधात रिपब्लिक टीव्ही ग्रुप आज मुंबई उच्च न्यायालयात जाणार आहे. विकासासाठी जामिन याचिका देखील आज दाखल करण्यात येणार आहे. बनावट टीआरपी प्रकरणात विकासला अटक करण्यात आली आहे.
या प्रकरणात अटक करण्यात आलेले खानचंदानी हे 13 वे व्यक्ती आहेत. या प्रकरणात सहाय्यक उपाध्यक्ष आणि रिपब्लिक मीडिया नेटवर्कचे वितरण प्रमुख घनश्याम सिंग यांनाही अटक करण्यात आली आहे. विकास अटक होणारा रिपब्लिक टीव्हीचा दुसरा अधिकारी आहे.
दोन वेळा चौकशीनंतर झाली अटक
अटक झाली असल्याची माहिती देत एका सीनियर पोलिस अधिकाऱ्याने म्हटले की, खानचंदानी यांचा जबाब दोने वेळा घेण्यात आला होता आणि त्यांची भूमिका रिपब्लिक टीव्हीचे डिस्ट्रीब्यूशन हेड घनश्याम सिंह यांच्या चौकशीदरम्यान समोर आली होती. तपास अधिकाऱ्याने म्हटले, 'आमच्याकडे खानचंदानी यांच्याविरोधात प्रत्यक्ष पुरावे आहेत आणि पहिलेच अटकेत असलेला आरोपी घनश्याम सिंहसोबत त्यांची लिंकही मिळाली आहे.'
पोलिसांना व्हॉट्सअपवरुन मिळाले महत्त्वाचे पुरावे
तपासकर्त्यांनी सांगितले की, खानचंदानी एक इंटरनल व्हॉट्सअप ग्रुपचा भाग होता. ज्यामध्ये LCN (लॉजिकल चॅनल नंबर) वर चर्चा होत होती. क्राइम ब्रांचने कोर्टात सादर केलेल्या चार्जशीटमध्ये उल्लेख केला होता की, चॅनलच्या अधिकाऱ्यांनी केबल ऑपरेटर आणि मल्टी सिस्टम ऑपरेटर्ससोबत मिळून रिपब्लिक टीव्हीला ड्यूल लॉजिकल चॅनल नंबर (LCNs) किंवा दोन फ्रीक्वेंसीवर चालवले. जे भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) च्या दिशा-निर्देशांचे उल्लंघन आहे.
फेक TRP केस काय आहे?
फेक TRP घोटाळा अक्टोबरमध्ये समोर आला होता. हंसाच्या एका अधिकाऱ्याने मुंबई पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली होती. यानंतर फक्त मराठी आणि बॉक्स सिनेमाच्या मालकांना अटक करण्यात आली होती. नोव्हेंबरमध्ये मुंबई पोलिस क्राइम ब्रांचने कथित फेक टेलीव्हिजन रेटिंग पॉइंटस (TRP) प्रकरणात 1,400 पानांची चार्जशीट दाखल केली. यामध्ये रिपब्लिक मीडिया नेटवर्क आणि न्यूज नेशनसह सहा चॅनलचे नाव होते. असे सांगण्यात आले होते की, TRP वाढवण्यासाठी जवळपास दोन वर्षांपासून पैसे दिले जात होते.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.