आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Research | 71% Of Indians Worry About 'privacy' Online, Survey By Market Research Firm IPSAS Across 50 Countries

रिसर्च:मार्केट रिसर्च कंपनी इप्साेसची 50 देशांत पाहणी, 71 % भारतीयांना ‘प्रायव्हसी’ ऑनलाइन हाेण्याची चिंता

छत्रपती संभाजीनगर18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

इशारा; सवयी बदलल्या नाही तर माेठ्या संकटाचा धाेका

85% भारतीयांना नैसर्गिक संकटाची शक्यता वाटते, जगभर असे मानणाऱ्यांचा आकडा ८० टक्के

पर्यावरण- ८२ महिला, ७९ टक्के पुरुषांच्या म्हणण्यानुसार हवामान बदलाचा परिणाम सर्वांवर हाेणार.
संकट, सुशिक्षित (८२ टक्के), स्वयंराेजगार करणाऱ्यांना (८३ टक्के)आपत्तीची सर्वाधिक भीती.
{७५ टक्के लाेक म्हणाले, पर्यावरणाच्या मुद्द्यावर लाेकांशी काय संवाद साधला पाहिजे, हे संशाेधकांनाही ठाऊक नाही.
शारीरिक आराेग्य- ८६ % लाेक म्हणाले, त्यांनी स्वत:कडे लक्ष देण्याची गरज आहे.
मानसिक आराेग्य- ८० टक्के मानसिक आराेग्यावरूनही तितकेच चिंताग्रस्त आहेत.
तरुण - २५-३४ वयाेगटातील ४२ टक्के लाेकांची मानसिक स्थिती गंभीर आहे. इतर वयाेगटाच्या तुलनेत हे प्रमाण सर्वाधिक आहे. ४५-५४ या वयाेगटातील सर्वात कमी चिंतीत आहेत.
आनंद : ३१ टक्के लाेक २०२३ बाबत आशावान आहेत. ५८ टक्के म्हणाले, ते आनंदी आहेत. ५९ टक्के भविष्याबद्दल सकारात्मक.

देश; बिझनेस लीडर्सवर विश्वास ठेवण्याबाबत भारत जगात दुसरा
79% भारतीयांच्या म्हणण्यानुसार वर्तमानात आनंदी राहावे, हे जास्त महत्त्वाचे, उद्याचे उद्याला पाहू

जाती-धर्म : ७८ टक्के भारतीयांना देशातील प्रत्येक जाती-धर्माच्या व्यक्तीसाेबत समान व्यवहार हाेताे, असे मानले जाते. जगातील सरासरी ५४ टक्के
ब्रँड : ७२ टक्के लाेकांना ग्लाेबल ब्रँड देशातील लाेकल ब्रँडच्या तुलनेत उत्कृष्ट उत्पादने बनवतात असे वाटते. २०२१ मध्ये हा आकडा ६२ टक्के हाेता.
तंत्रज्ञान : ७२ टक्के भारतीयांना तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे लाेकांचे जीवन उद्ध्वस्त झाले आहे, असे वाटते. यादीत पाकिस्तानातही आहे. संयुक्त अरब अमिरातमध्ये सर्वाधिक ७६ टक्के लाेकांना असे वाटते. स्वीडनचे ४१ टक्के लोक असे मानतात.
इंटरनेट- ८४ टक्के भारतीयांना विनाइंटरनेट जगणे कठीण वाटते.
खासगी-७१ टक्के लाेकांना सरकार व कंपन्या त्यांच्याबद्दल काय-काय जाणतात, याची भीती नाही. ते प्रायव्हसी ऑनलाइन हाेण्याच्या धाेक्यामुळे चिंतेत आहेत. भारत जगात आघाडीवर आहे.

जगभर; ७५% लोकांना महागाई, ६८ टक्क्यांना बेरोजगारीची भीती
55% लोकांनुसार समाजात महिलांची प्रमुख भूमिका केवळ पत्नी किंवा आईपुरती मर्यादित नाही

व्याज- ७४ टक्के लाेकांच्या म्हणण्यानुसार यंदा दरवाढ शक्य
आण्विक युद्ध- ४८ टक्के म्हणाले, यंदा जगभरात कुठेही युद्धादरम्यान आण्विक शस्त्रास्त्रांचा वापर शक्य.
हवामान - ५७ टक्के म्हणाले, २०२३ देशाच्या इतिहासातील सर्वाधिक उष्ण वर्ष ठरू शकते.
काेराेना- ६० टक्के म्हणाले, काेराेना लाॅकडाऊन नसेल.
मेंदू प्रत्याराेपण : २७ टक्के म्हणाले, यंदा मेंदू प्रत्याराेपणातून स्मरणशक्ती आणणे शक्य
हाेऊ शकेल.
अंतराळ पर्यटन- ३९ % म्हणाले, यंदा चांद्रभ्रमंती सुरू.
भविष्य - ६५ टक्के म्हणाले, पुढील वर्ष चांगले असेल, हा आकडा दहा वर्षांत सर्वात कमी.
स्थलांतरित- ६४ टक्के म्हणाले, त्यांच्या देशात स्थलांतरितांची संख्या गरजेपेक्षा जास्त आहे.
शहरीकरण- २०५० पर्यंत ६८ % शहरात जाण्याची शक्यता, २००० मध्ये हे प्रमाण ४७ टक्के हाेते.

कुणाची पाहणी?
इप्साेसने केली भारतासह ५० देशांत १६-७५ वयाेगटातील ४८ हजार ५७९ जणांची पाहणी. २३ सप्टेंबर-१४ नाेव्हेंबर २२ चा अहवाल फेब्रुवारीत जाहीर . या देशांची जागतिक अर्थव्यवस्थेत ८७%, लाेकसंख्येत ७० %भागीदारी.

बातम्या आणखी आहेत...